शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोची चमकोगिरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, पिंपरी-चिंचवड शहरात वाढल्या जाहिराती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असून, स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम शहरात सुरू झाले आहे. या कामांविषयीची फ्लेक्सबाजी जोरात सुरू असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उजेडात आले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असून, स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम शहरात सुरू झाले आहे. या कामांविषयीची फ्लेक्सबाजी जोरात सुरू असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उजेडात आले आहे.पुणे मेट्रोची पायाभरणी गेल्या दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम पिंपरी येथे सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६.५ किलोमीटर असून, त्यांपैकी पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी असून, उर्वरित उन्नत मार्ग असणार आहे. त्यात १५ स्थानके असून, त्यांपैकी नऊ पुलांवर, तर भुयारी स्थानके सहा असणार आहेत.महामेट्रोसाठी पुणे मेट्रो रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरापासूनच प्रत्यक्षपणे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प उभारताना संस्थेने जी उद्दिष्टे ठेवली आहेत, त्यांपैकी प्रत्यक्ष कामांऐवजी चमकोगिरी रस्त्यावरील फ्लेक्सवरून दिसत आहे. मेट्रोच्या कामांमध्ये स्थानिकांना किती रोजगार मिळाला, हा संशोधनाचाच भाग आहे.पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी ते पिंपरी या टप्प्यात वृक्षतोड केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रथम प्रसिद्ध केले होते. वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्षसंवर्धनाबाबत मेट्रोचे परिणामकारक धोरण नसल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्षपिंपरी-चिंचवड परिसरातून जाणाºया मार्गावरील काही चौकात मेट्रोने गणेशोत्सवानिमित्त स्वागताचे फ्लेक्स उभारले आहेत. मोरवाडी चौकातून न्यायालयाकडे जाणाºया रस्त्यावर सुप्रीम हॉटेलसमोर, तसेच मोरवाडी चौकातून महापालिकेकडे जाताना अहल्यादेवी होळकर पुतळ्याशेजारी बांबंूच्या साह्याने फ्लेक्सबाजी केली आहे. ही विनापरवना आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील रस्त्यावर महामेट्रोने फ्लेक्सबाजी केली आहे किंवा नाही. याबाबत प्रशासनाकडे माहिती नाही. परवानगीसाठी मेट्रोने कोणताही अर्ज केलेला नाही किंवा आम्ही लेक्स उभारणीसाठी अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. याबाबत खात्री करून कारवाई केली जाईल.- योगेश कडुसकर, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभागगणेशोत्सवातील रस्त्यावर उभारण्यात येणाºया फ्लेक्सचे काम खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्या फलकांना महापालिकेची परवानगी घेतली किंवा नाही याबाबत आता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. माहिती घ्यावी लागेल. -ई. डी़ रामनाथ,संचालक, पुणे महामेट्रो

टॅग्स :Puneपुणे