शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

लकी ड्रॉच्या आमिषाने फसवणुकीचे वाढले प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 02:02 IST

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान : अनेक प्रकारच्या सवलतींचे पॅकेज देऊन ग्राहकांना केले जाते आकर्षित

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : एखाद्या मॉलमधून खरेदी करून बाहेर पडल्यानंतर तेथे थांबलेले प्रतिनिधी ग्राहकांकडून लकी ड्रॉ कूपनसाठी माहितीचा फॉर्म भरण्याचा आग्रह धरतात. फॉर्म भरून घेतल्यानंतर दोन दिवसांनी लकी ड्रॉ विजेते ठरल्याचे सांगून ग्राहकांना विशिष्ट ठिकाणी बोलावले जाते. त्यांना काही पॅकेज खरेदीची गळ घातली जाते. त्यांच्याकडून पुढील तारखेचे धनादेश घेतले जातात. आर्थिक फसवणूक होत असल्याचे कटू अनुभव आल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील महिलांनी या विषयी तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यांनतर ठोस कारवाईसाठी पोलिसांपुढे अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर प्रवेश करताच, काही डेबिट कार्ड आणि के्रडिट कार्डवाले ग्राहकांना कार्ड घेण्यासाठी गळ घालतात. स्वस्तात आणि सुलभ हप्त्यात सेकंड होमचा पर्याय अशा स्वरूपाचे आमिष दाखविणारे भूखंड विक्री करणारे प्रतिनिधी ग्राहकांना तेथे भेटतात. मॉलमधील खरेदी आटोपून बाहेर पडताना प्रवेशद्वाराजवळ काही लोक ग्राहकांना थांबवून लकी ड्रॉ कूपनसाठी माहितीचा फॉर्म भरण्याचा आग्रह धरतात. एक-दोन दिवसांतच ज्यांनी लकी ड्रॉ कूपनसाठी माहिती घेतली होती, त्यांच्याकडून मोबाइलवर ग्राहकाशी संपर्क साधला जातो. लकी ड्रॉचे बक्षीस जाहीर झाले आहे, ते नेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी बोलावण्यात येते. तेथे गेल्यानंतर मल्टिलेव्हल मार्केटिंगवाले ग्राहकास भंडावून सोडतात. त्यांच्याकडून धनादेश घेतात, त्यातून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा तक्रारी पिंपरी-चिंचवडमधील नागरिक करू लागले आहेत. फसवणुकीची प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर ज्यांनी बक्षीस नेण्यासाठी ग्राहकांना बोलावले, ते पोलीस ठाण्यात हजर होतात. आम्ही काही फसवणूक केलेली नाही. त्यांना सवलतीचे पॅकेज दिले आहे, त्या बदल्यात काही रकमेचा धनादेश घेतला आहे.

पर्यटनाचे पॅकेज, त्याची कूपन दिलेली आहेत. काही खर्च आम्ही कंपनीतर्फे करणार आहोत, इतर खर्च लकी ड्रॉ कूपनचे विजेते ठरलेल्या ग्राहकाला करायचा आहे. ते त्यांच्या सोईने कूपनवर दिलेल्या कालावधीत या संधीचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे अगोदरच फसवणूक झाली असे म्हणणे उचित नाही, असे मल्टिलेव्हल मार्केटिंगवाले पोलिसांना पटवून देतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना पोलीसही पेचात पडत आहेत. या प्रकरणी तक्रार करूनही फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेतला जात नसल्याने नागरिक हवालदिल आहेत.बक्षिसासाठी जोडीने येण्याचा आग्रहमॉलजवळ ग्राहकाचा मोबाइल क्रमांक, पत्ता याची माहिती संकलित करून त्या माहितीचा गैरउपयोग करणारे रॅकेट शहर आणि परिसरात सक्रिय आहे. पिंपरी आणि चिंचवडच्या मॉलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना औंध येथील मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या कार्यालयात बोलावले जाते. केवळ पुरुषाला प्रवेश नाही. पती,पत्नीने जोडीने येऊन बक्षीस घेऊन जावे, असा आग्रह धरला जातो. एवढेच नव्हे, तर येताना कोरे धनादेश बरोबर असावेत, अशीही सूचना आवर्जून दिली जाते. तेथे गेल्यानंतर त्यांच्या विविध योजनांपैकी कोणत्या ना कोणत्या योजनेत सहभागी होण्याची गळ धातली जाते. कुटुंबासाठी, पत्नीसाठी एवढेही करू शकत नाही, असे अपमानास्पद बोलून एखाद्या योजनेत सहभागी होण्यास भाग पाडले जाते.मॉल व्यवस्थापनाचे दुर्लक्षमॉलमध्ये येणाºया ग्राहकांची कोणी फसवणूक करणार नाही. मॉलच्या आवारात ग्राहकांची फसगत करणाºया टोळीतील कोणी थांबणार नाही, याची दक्षता मॉल व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. मॉलच्या आवारात अथवा मॉलच्या बाहेर प्रवेशद्वारावर थांबलेले आणि ग्राहकांची फसवणूक करणारे मॉलशी संबंधितच असावेत, असा ग्राहकांचा समज होतो. मोबाइल क्रमांक, पत्ता अशी माहिती ग्राहक पटकन पुरवितात. त्या माहितीच्या आधारे त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यामुळे मॉलच्या व्यवस्थापनाने अशा भामट्यांना त्यांच्या परिसरात थारा देऊ नये. त्यांनीच पोलिसांकडे त्यांच्याबद्दल तक्रार करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.