शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:01 IST

‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पिंपरी : ‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी प्रदर्शनातील पुणेरी बाणा अनुभवण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नागरिकांनी सभागृहाबाहेर रांगा लावल्या होत्या.महापौर नितीन काळजे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, बांधकाम व्यावसायिक मकरंद पांडे, दिलीप सोनिगरा, नितीन धिमधिमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिली. या वेळी महापौर काळजे म्हणाले ‘‘पुण्याची ओळखच वेगळी आहे. एक पुणेकर कुठेही नेला तरी झाकला जाऊ शकत नाही. खऱ्या पुण्याची व पुणेकरांची जाणीव पुणेरी पाट्या वाचल्यानंतर होते. माणसाच्या बौद्धिक ज्ञानात भर टाकणाºया अशा या पाट्या आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार होणे पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’नगरसेविका अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘पुणे तेथे काय उणे या प्रमाणे पुण्याची ओळख या पाट्यांमधूनच होते. पुण्यातील लोकांची अस्सल बुद्धिमत्ता या पाट्यांमधून झळकते. त्या लोकांची बुद्धिमत्ता सगळ््यांना जाणून घेता यावी यासाठी लोकमतने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’’आउट डोअर पार्टनर धिरेंद्र सेंगर म्हणाले, ‘‘पुणेरी पाट्या विचार करायला लावणाºया व काहीतरी नवीन शिकवणाºया आहेत. कुठेतरी आपले काहीतरी चुकत आहे हे सांगणाºया सुचक आहेत, त्यामुळे या पाट्या वाचून नकळत आपल्याकडून होणाºया चुका टाळण्याची संधी आपल्याला आहे.’’पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाचे खूप आकर्षण होते. एकाच छताखाली पुणे अनुभवण्याची संधी मिळाली. सदाशिव व इतर पेठेंमधील लोकांची बौद्धिकता पाहयला मिळाली, अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.उत्स्फूर्त प्रतिक्रियाया उपक्रमातून पुणेकरांचा स्पष्ट वक्तेपणाचा गौरव लोकमततर्फे केला गेला. या प्रदर्शनामुळे उद्योगनगरीतील नागरिकांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटली. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.व्हॉट्सअ‍ॅपवर चलतीअनेक तरूण-तरूणी पुणेरी पाटीसमोर सेल्फी काढत होते. सेल्फी काढून व्हाटसअपवर स्टेटस टाकून ‘मी पुणेरी पाटी प्रदर्शनास हजेरी लावली’ तुम्हीही या अशा प्रकारचे संदेश मित्र व नातेवाईकांना पाठवले जात होते. 

टॅग्स :LokmatलोकमतPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड