शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात गमावला पाय; चिंचवड येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:38 IST

लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देवाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून तोडला सिग्नल पोलिसांच्या कारवाईला टाळून बेपर्वाईने कृती करणे असुरक्षित : संजीव पाटील

पिंपरी : लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षदर्शींकडून अपघातामागील खऱ्या कारणाचा उलगडा झाला. बुधवारी चिंचवड येथे घडलेल्या अपघाताची शहरात सर्वत्र चर्चा आहे. चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल चौकातून रेवान्ना अश्रुबा कोपनर (वय ३५, रा. चोपडेवाडी, बीड) हा ट्रक घेऊन जात होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून त्याने सिग्नल तोडला. या वेळी वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू तो तेथे थांबला नाही. त्याने ट्रक तसाच पुढे नेला. वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र त्यांना न जुमानता तो चपळाईने निघून जाऊ लागला. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने रस्त्यातच ट्रक थांबवला. खाली उतरला. काही अंतर पुढे पायी जात असतानाच, ट्रकला हॅन्डब्रेक न लावल्यामुळे ट्रक आपोआप उताराने पुढे जाऊ लागला. विनावाहक ट्रक उताराने खाली आल्यास दुर्घटना घडू शकते, हे लक्षात येताच, त्याने धावपळ केली. चालत्या ट्रकमध्ये चढण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र ट्रकमध्ये चढण्यापूर्वीच ट्रक दुभाजकाला धडकला. ट्रक थांबविण्यासाठी धावपळ करत असताना, दुभाजकाला धडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याचा डावा पाय निकामी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नियमांचे पालन केल्यास टळेल धोकाचिंचवड विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संजीव पाटील म्हणाले, की सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनचालकाला अडविणे चुकीचे नाही. पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या वाहनचालकांच्या ताब्यातील वाहनाची कागदपत्रे नसतात. अनेकदा जुनी वाहने धोकादायक ठरणारी असतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला टाळून बेपर्वाईने कृती करणे वाहनचालकांना स्वत: साठी तसेच रहदारीच्या रस्त्यावर इतरांसाठीही असुरक्षित ठरणारे आहे. हे बुधवारच्या घटनेतून निदर्शनास आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीड