शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 3:00 AM

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांनी आरक्षण रद्द करून पैसे परत घेतल्याने वल्लभनगर आगाराला ३६ लाख ६५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती आगार व्यस्थापक अनिल भिसे यांनी दिली.वल्लभनगर आगारातील एकूण १३० एसटी बसगाड्या दोन दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावाकडे जाण्यासाठी आगारात येणाºया नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होत आहे. अनेक नागरिकांना दिवाळी, भाऊबीज, इतर महत्त्वाच्या कामासाठी गावाकडे जाता आले नाही. संपामुळे झालेल्या गैरसोयीने संतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाºयांनी दुसºया दिवशीही संप मागे न घेतल्याने बसगाड्या मार्गावर धावल्या नाहीत.पैसे परत घेण्यासाठी रांगासंप मिटल्यास गावी जाता येईल, अशा आशेने अनेक प्रवासी सकाळपासून आगारात बसून होते. मात्र, संप न मिटल्यामुळे आलेले अनेक नागरिक नाराज होऊन पुन्हा घराच्या दिशेने परतले. अनेक नागरिकांनी दिवाळीच्या सुटीत एसटी बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी आगाऊ नोंदणी करुन एसटीचे आरक्षण केले होते. परंतु, अचानक पुकारण्यात आलेल्या बंदमुळे अनेकांनी आपले पैसेपरत घेण्यासाठी रांग केली होती. गेल्या दोन दिवसात ६ लाख ६५ हजार रुपये प्रवाशांना परत करण्यात आले आहेत. या संपामुळे वल्लभनगर आगारातील एकूण १३० एसटीबस दोन दिवसांपासून बंदठेवण्यात आल्या. त्यामुळेआगाराचे दोन दिवसांचे एकूण ३६ लाख ६५ हजार रुपये एवढे मोठे नुकसान झाले आहे.दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांनी आरक्षण रद्द करून पैसे परत घेतल्याने वल्लभनगर आगाराला ३६ लाख ६५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. - अनिल भिसे, आगार व्यस्थापकसातव्या वेतन आयोगाप्रमाणे जोपर्यंत पदनिहाय वेतन श्रेणी मिळत नाही. शासकीय कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांना सुविधा मिळाव्यात, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी. २००० पासून कनिष्ठ कामगारांना वेतनातील विसंगती दूर कराव्यात. इतर मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वल्लभनगर आगारातील संप कायम राहील, अशी संघटनेची भूमिका आहे. - प्रवीण मोहिते, अध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना (वल्लभनगर)एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले असल्यामुळे चिंचवड प्रवासी संघटनेने राज्य शासनाचा निषेध केला आहे. एस. टी. कर्मचाºयांच्या हक्काच्या मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात.- गुलामअली भालदार,अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघकर्नाटकच्या बसगाड्याही बंदनेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने पुकारलेल्या बंदची झळ कर्नाटक राज्यालाही बसली आहे. महाराष्टÑाच्या विविध शहरांतून कर्नाटकला जाणाºया कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस जागेवरच थांबल्या आहेत. येथील कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाशी त्यांचा संबंध येत नाही. मात्र, महाराष्टÑातील एसटी बंद असताना, या बस मार्गावर धावू लागल्यास तोडफोडीने नुकसान होण्याच्या भीतीने कर्नाटकच्या २२ बस ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.कर्नाटक राज्यातील बस पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच अन्य डेपोंत थांबवून ठेवल्या आहेत. सलग दुसºया दिवशी या गाड्या मार्गावर धावल्या नाहीत. वल्लभनगर आगारात कर्नाटकच्या २२ बस उभ्या आहेत. रोजचे प्रत्येकी एक लाख रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी दोन दिवसांत त्यांना २२ लाखांचा फटका बसला आहे. महाराष्टÑ राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे वल्लभनगर आगारातील आंदोलक, कर्नाटकच्या बस चालकांना आपण बसगाड्या मार्गावर सोडाव्यात, आमचा विरोध नाही. तुमचा या आंदोलनाशी संबंध नाही. येथून बस मार्गावर सोडल्यानंतर पुढे काही अनुचित प्रकार घडू शकणार नाही, याबद्दल काही सांगू शकत नाही, असे स्पष्ट सांगत असल्याने कर्नाटक बसगाड्यांवरील चालक, वाहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बस थांबल्याने नुकसान होत आहे. परंतु,आंदोलनात बसचे काही नुकसान झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, या भीतीपोटी कर्नाटकच्या बसगाड्या जैसे थे थांबवून ठेवल्या आहेत.संपावर तोडग्याची प्रतीक्षापिंपरी-चिंचवड आगारातून कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील सिंधगी, इंडी, मुद्देबिहाळ, मुदोळ, भटकळ, हुबळी, बालकी, काळगी या डेपोमधील बस दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आगारात उभ्या आहेत. दोन दिवसांपासून ४५ चालक-वाहक या आगारात मुक्कामी आहेत. त्यांचीही राहण्या-खाण्याची गैरसोय होत आहे. संपावर कधी तोडगा निघेल, याची त्यांनाही प्रतीक्षा आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड