शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलांना लुटणारे गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 19:48 IST

वयोवृद्ध सहा महिलांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसुन एअरगनचा धाक दाखवून गळ्यातील लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणा-या अट्टल चोरट्यांना गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन अटक केली.

वडगाव मावळ :वयोवृद्ध सहा महिलांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसुन एअरगनचा धाक दाखवून गळ्यातील लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणा-या अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन अटक केली. एकून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.विकास तुकाराम जाधव(रा.कामशेत) संतोष उर्फ भावड्या अंकुश वाडेकर(रा.नाणे रोड,कामशेत)यांना अटक केली असून नागेश केवराव गायकवाड, सुदाम साबाजी भांगरे हे दोघे पळून गेले.वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ तारखेला कान्हे फाटा येथे चिंधाबाई राघू पवार वय ७९ यांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसुन धाक दाखवून गळ्यातील दोनतोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधिक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे वेषन शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांना याबाबत सुचना दिल्या.

पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट म्हणाले वडगाव हद्दीत दोन, कामशेत दोन, लोणावळा ग्रामीण एक व चाकण एक असे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. सदरचे सोने हे काही सोनारांना विकले असून लवकरच उघडकीस येईल.या चारजणांनी आत्तापर्यत वयोवृद्ध महिलांना लुटले आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनित काॅवर याच्या मार्गदर्शनाखाली पदमाकर घनवट सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, शब्बीर पठान, गणेश महाडीक, रौफ इनामदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कान्हे फाटा येथे सापळा रचून अटक केली. यामधील दोघेजण पळून गेले. अटक केलेल्या दोघांकडून एअरगण, दोन मोबाईल, कार असा ऐवज जप्त केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस