शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
4
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
5
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
6
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
7
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
8
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
9
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
10
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
11
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
12
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
13
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
14
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
15
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
16
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
17
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
18
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
19
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
20
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

पाणीपट्टी दरवाढीतून सामान्यांची लूट, पाच टक्के वाढ नव्हे दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:54 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याचे कौशल्य प्राप्त झालेले नाही. पिण्याच्या पाण्यावर चर्चा होऊ न देताच सत्ताधा-यांनी मनमानीपद्धतीने शहरवासीयांच्या माथी दरवाढ लादली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याचे कौशल्य प्राप्त झालेले नाही. पिण्याच्या पाण्यावर चर्चा होऊ न देताच सत्ताधा-यांनी मनमानीपद्धतीने शहरवासीयांच्या माथी दरवाढ लादली आहे. उपसूचनेतही लपवा-छपवी करण्यात आली. मूळ उपसूचनेत सभेनंतरही बदल केले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जनतेला पाच टक्के पाणी दरवाढ दाखवून नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचविण्याचे काम केले आहे. प्रशासनाच्या विषयात सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाण्याचे गाजर दाखवून छुप्या पद्धतीने दरवाढ केली आहे. सभागृहात उपसूचना एक वाचवून दाखविली आणि मंजूर दुसरीच केली. राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेचे मत विचारात न घेताच हुकूमशाही पद्धतीने विषय मंजूर केला. पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना सादर केला. पाण्यावरून वादळ झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी तहकूब झालेली सभा पुन्हा सुरू होऊन संपल्यानंतर काही वेळांनी पाण्याबाबतच्या उपसूचनेत ऐनवेळी बदल करण्यात आला.>पीएमपीच्या दीडशे कामगारांबद्दल सहानुभूती बाळगणाºयांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांना नागरिकांवर लादलेल्या दरवाढीवर तोंड उघडता आले नाही. भाजपाच्या नगरसेवकांचे पाण्याच्या मुद्यावरून लांगुलचालन महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय होता.>प्रशासनाच्या कारभारास मूकसंमतीपाणी बिलाबाबतची प्रचलित पद्धत बदलून प्रशासनाने नवीन प्रस्ताव तयार केला. त्यास स्थायी समितीने मूकसंमती दिली होती. त्यावर शिष्टाई करून महासभेने दरांत किरकोळ बदल करून प्रशासनाचा विषय मंजूर केला आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणाºया तसेच सोसायट्यांमध्ये राहणाºया नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. पाणी गळतीचे खापरही सर्वसामान्य नागरिकांवर फोडण्यात आले आहे. तसेचसेवाकराचे नवीन भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसविले आहे. तीस टक्के गळतीस कारणीभूत असणाºयांवर कारवाई करण्यापेक्षा नागरिकांवर भार टाकण्यात भाजपाने धन्यता मानली आहे. पाणीपुरवठ्याचा दहा वर्षांचा बॅकलॉक भाजपाने भरूनकाढला आहे.>सत्ताधारी नगरसेवकांनी गायले दरवाढीचे गोडवेपाणीपुरवठ्यावरून झालेल्या चर्चेत शिवसेना, मनसे आणि राष्टÑवादीने प्रखर विरोध केला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीच नाहीत. गटनेत्यांची समिती नेमा ही सूचनाहीसत्ताधाºयांनी धुडकावून लावली. दुसरीकडे तुषार कामठेआणि संदीप कस्पटे वगळता सत्ताधाºयांनी पाणीदरवाढीचे समर्थन केले. गृहपाठ करून घेतलेल्या काही महिलांनी तर पाणीदरवाढीचे गोडवे गायले. पाणीदरवाढ नागरिकांच्या माथी मारण्यासप्रोत्साहन दिले.>झोपडीधारकांसाठी धोरण१ ते ६००० लिटर : मोफत पाणी६००१ ते १५००० लिटर : २ रुपये (प्रतिहजारी)१५००१ ते २२५०० लिटर : ३ रुपये (प्रतिहजारी)२२५०१ ते ३०००० लिटर : ८ रुपये (प्रतिहजारी)३०००१ च्या पुढे : १२ रुपये (प्रति हजारी)प्रति सदनिका / कुटूंब : ६०० रुपये सेवाशुल्कमीटर नसलेले : ९०० रुपये सेवाशुल्क>इतर घटकांसाठी धोरणवाणिज्य वापर : ५० रुपये (प्रतिहजारी)शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन, रुग्णालये : १५ रुपये (प्रतिहजारी)धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम : १० रुपये (प्रतिहजारी)क्रीडासंकुल : २० रुपये (प्रतिहजारी)महापालिका मालमत्ता : १० रुपये (प्रतिहजारी)अवैध नळजोडधारकांना वाढीव दराने पाणीपट्टीबिल वेळेत न भरणाºयांना वार्षिक १० टक्के दंडपाणीपट्टीत दर वर्षी ५ टक्के वाढ होणार>सध्या असणारे पाण्याचे दर० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २.५० रुपये३० ते ५० हजार लिटर-प्रतिहजार ५.५० रुपये५० ते ७५ हजार लिटर-प्रतिहजार १० रुपये७५ हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार १५ रुपयेवाणिज्यसाठी- प्रतिहजार ३५ रुपये>स्थायीने सुचविलेली दरवाढ० ते ६ हजार लिटर- बिल नाही६ ते १५ हजार लिटर-प्रतिहजार ८ रुपये१५ ते २२ हजार पाचशे लिटर-प्रतिहजार १५ रुपये२२.५०० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २५ रुपये३० हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार ३५ रुपयेवाणिज्य वापरासाठी ५० रुपये प्रतिहजार लिटर>सर्वसाधारण सभेची मंजुरी१ ते ६००० लिटर : मोफत पाणी६००१ ते २२५०० लिटर : ४ रुपये (प्रतिहजारी)२२५०१ ते ३०००० लिटर : ८ रुपये (प्रतिहजारी)३०००१ च्या पुढे : १२ रुपये (प्रतिहजारी)प्रतिसदनिका / कुटुंब : १२०० रुपये सेवाशुल्क

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड