शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा नगरपरिषदेच्या तुंगार्ली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:03 IST

लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे.      स्वत:च्या मालकीचे धरण असलेली लोणावळा ही एकमेव नगरपरिषद आहे. मागील काही वर्षापासून या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती अल्पप्रमाणात सुरु होती. आता मात्र धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. तुंगार्ली धरणाच्या मजबुतीकरणाचा विषय मागील अनेक वर्षापासून रखडलेला आहे. नगरपरिषदेने 2001 सालापासून शासनाकडे या धरणाच्या मजबुतीकरणाकरिता निधी मिळावा अशी मागणी लावून धरली आहे मात्र पाठपुराव्याचा अभाव व शासनाचे उदासिनतेचे धोरण यामुळे हा विषय अद्याप लालफितीत आडकला आहे. 20 हेक्टर जागेत 1.3 एमएलडी क्षमतेचे हे धरण आहे. न्यू तुंगार्ली परिसरात या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मजबुतीकरणाअभावी धरण अडगळीस पडले आहे. धरणाच्या मजबुतीकरणाचा विषय व गाळ काढण्याचे काम मार्गी लागल्यास शहरातील पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. देखभाल व दुरुस्ती अभावी धरणाच्या भितीवर मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे वाढली आहेत तसेचर धरणाच्या भिंतीच्या दगडी देखिल पडू लागल्या असून सुरक्षा रेलिंग तुटलेले आहे. धरणाच्या खालून पांगळोली ठाकरवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहत आहे. यदाकदाचित धरणाची गळती वाढली व धरण फुटल्यास न्यु तुंगार्ली भागाला याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. वेळीच या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरु करणे गरजेचे असून याकरिता नगरपरिषदेने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिक करत आहे. या धरणाच्या लगतची काही जागा ही नगरपरिषदेचे उद्यान, पिकनिक व मनोरंजन पार्क करिता आरक्षित आहे. या जागेचा देखिल विकास झाल्यास लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरणार आहे. तुर्तास तरी या धरणाच्या मजबुतीकरणाच्या मुद्दयाकडे गांर्भिर्याने पाहण्याची गरज आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळा