शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:11 IST

निसर्ग चक्रीवादळाने मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा शहरात पाऊस व वारा सुरू झाला.

ठळक मुद्देलोणावळा उपविभागातील विजेचे १४० खांब पडले 

लोणावळा : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा लोणावळा शहरात वीज वितरण कंपनीला बसला आहे. वादळाने लोणावळा उपविभागातील लाईटचे १४० खांब पडले आहेत. यामध्ये उच्चदाब वाहिनीचे ६१ व लघुदाब वाहिनीचे ७९ खांब पडले आहेत. तर उच्च दाब वाहिनीचे १२  व लघुदाब वाहिनीचे ३३ खांब वाकले असल्याची माहिती वीज महावितरणचे लोणावळा उपविभागीय अभियंता उमेश चव्हाण यांनी दिली.      निसर्ग चक्रीवादळाने मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा शहरात पाऊस व वारा सुरू झाला. बुधवारी पावसाचा व सोसाट्याच्या वार्‍या जोर वाढल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली.त्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. लोणावळा उपविभागाला विद्युत पुरवठा करणार्‍या १०० केव्ही सब स्टेशनला वीज पुरवठा करणारी टॉवर लाईन सुरू झाली असली तरी दुरुस्ती कामाकरिता फिडर बंद ठेवण्यात आले आहेत.

टप्प्या टप्प्याने विभागवार वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरणची संपूर्ण टिम, कंत्राटी कामगार प्रयत्नशील आहेत. दरम्यान 24 तासांहून अधिक काळ संपूर्ण लोणावळा शहर‍चा व ग्रामीण भागाचा वीज पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. सर्व विद्युत उपकरणे बंद पडली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कोणत्याही भागात विजेचे खांब अथवा तारा तुटल्या असल्यास महावितरणला माहिती द्यावी असे आवाहन मंडळाने केले आहे.

निसर्ग वादळाने खंडाळा पोलीस चौकीचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्याने पोलिसांना पावसात थांबण्याची वेळ आली आहे.

एमटीडीसीमध्ये घरांची पडझड महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्ला येथील निवासस्थाने वादळाने नुकसान झाले आहे. अनेक घरांची छपरे उडाली असून झाडे पडली आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाmahavitaranमहावितरणRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ