शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 12:42 IST

शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्देशिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे.रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.शिरूर मतदार संघातील दिघी येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी 7 रिक्षांची सोय करण्यात आली आहे.

पिंपरी - राज्यातल्या चौथ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे. अनेक दिग्गज उमेदवारांच भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होतं आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या मतदार संघात मतदान पार पडत आहे. शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या दोन मतदार संघामध्ये मतदान पार पडतं आहे. 23 एप्रिलला पुण्यात मतदान पार पडले होते. पुणेकरांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे अवघे 49 टक्के मतदान पुण्यात झाले. मतदान केंद्रावर जाण्यासाठी अनेकदा सुविधा नसल्यामुळे दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास कोणी नसल्यास असे मतदार मातदानापासून मुकतात. त्यामुळे या वेळेस प्रशासनाने खबरदारी घेतली असून, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी ऑटो रिक्षाची सोय करण्यात आली आहे. शिरूर मतदार संघातील दिघी येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी 7 रिक्षांची सोय करण्यात आली आहे. आज दिवसभर ही सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 12 वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्याईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदान