शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तळेगावमध्ये प्रवाशांनी रोखली लोकल, प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:11 IST

लोकलची अनियमितता, प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलमध्ये पायही ठेवायला जागा नसल्याने प्रथमश्रेणीच्या डब्यात प्रवाशांची झालेली घोसखोरी, प्रथम श्रेणीतील प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वैतागून तळेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी बुधवारी सकाळी सुमारे पाऊन तास लोकल रोखून धरली.

तळेगाव दाभाडे : लोकलची अनियमितता, प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलमध्ये पायही ठेवायला जागा नसल्याने प्रथमश्रेणीच्या डब्यात प्रवाशांची झालेली घोसखोरी, प्रथम श्रेणीतील प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वैतागून तळेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी बुधवारी सकाळी सुमारे पाऊन तास लोकल रोखून धरली.लोणावळा स्थानकावरून सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी सुटणारी लोकल बुधवारी तळेगाव रेल्वे स्थानकावर आली असता प्रथम श्रेणी डब्यात अन्य प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली. उभे राहण्यासही धड जागा नसल्याने प्रवासी वैतागले होते. रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरत प्रवाशांनी सुमारे ४५ मिनिटे लोकल या स्थानकावर रोखून धरली. प्रथम वर्ग डब्यातून प्रवास करणाºया प्रवाशांना आज मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. या लोकलला प्रचंड गर्दी असल्याने सामान्य (द्वितीय श्रेणी) डब्यातून प्रवास करणारे प्रवासी प्रथम वर्ग (प्रथम श्रेणी) डब्यामध्ये चढले. त्यामुळे प्रथम वर्ग डब्यातून प्रवास करणाºया प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.लोकलला नेहमीच उशीर होत असल्याने आज तळेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पहावयास मिळाला. संतप्त प्रवाशांनी लोकल रोखून धरत स्टेशन मास्तरला घेराव घातला. प्रवाशांच्या भावना तीव्र होत्या. स्टेशन मास्तरांच्या तोंडी आश्वासनानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले. अलीकडच्या काळात पुणे-लोणावळा लोकल मार्गावरून प्रवास करणाºया नागरिकांना लोकलच्या उशिरा येण्यामुळे कामावर लेटमार्क होऊ लागले आहेत. कामगारांच्या लेटमार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. उशिरा येणारी लोकल प्रवाशांनी भरून येत असल्याने नाईलाजाने अनेक प्रवासी प्रथम श्रेणीमधून प्रवास करत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रथम वर्ग डब्यातील प्रवाशांना हकनाक मनस्ताप होतो आहे. असाच प्रकार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास तळेगाव रेल्वे स्थानकावर घडला.प्रवाशांच्या विविध मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, तळेगाव नगर परिषदेचे पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांपूर्वी तळेगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले होते. पुणे-लोणावळा व लोणावळा-पुणे या मार्गांवर लोकलची संख्या वाढविण्याची मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाची मागणी आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यापुढे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास रेल्वे व्यवस्थापनास याची मोठी किंमत मोजावी लागू शकेल, असे संकेत मिळत आहेत.प्रथम श्रेणीतही मिळेना जागाया लोकलने मावळ भाग तसेच पुढे देहूरोड, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड या ठिकाणावरून पुण्याकडे कामाला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या लोकलला नेहमी गर्दी ठरलेली असते. मात्र, आज या लोकलमधील गर्दीने कहर केला. द्वितीय श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी गर्दीमुळे प्रथम श्रेणीच्या डब्यात चढले. मोकळा प्रवास करण्यासाठी जास्त पैसे मोजून प्रथम श्रेणीचे तिकिटे व पास काढलेल्या प्रवाशांना यामुळे अडचण जाणवली. हे नित्याचेच आक्रमण होऊ लागल्याने प्रवासी नागरिकांचा संतापाचा पारा चढून लोकल चक्क पाऊणतास रोखून धरली. ‘लोकलमधील सुरक्षा व्यवस्था अतिशय संतापजनक आहे. एखादा दिवस वगळता कधीच प्रथम श्रेणीच्या तसेच महिलांच्या डब्यात पोलीस नसतात. रेल्वेच्या ढासळलेल्या व्यवस्थापनामुळे दररोज होणारी गर्दी तसेच एका श्रेणीतील प्रवासी दुसºया श्रेणीच्या डब्यात चढण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. असा आरोप प्रथम श्रेणीतून प्रवास करणाºया नागरिकांनी केला आहे.अर्ध्या तासाला हवी लोकलसकाळी आठ वाजून २० मिनिटांची लोणावळा स्थानकावरून सुटणारी लोणावळा-पुणे लोकल तळेगाव स्थानकावर ८़५० वाजता येणार असल्याचे रेल्वे वेळापत्रकात सांगण्यात आले आहे. मात्र, ही लोकल एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता कधीच नऊच्या अगोदर येत नाही. इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडीसाठी ही लोकल थांबविली जाते. त्यामुळे या लोकलची तळेगाव स्थानकावर पोहोचण्याची वेळ नऊ अशीच प्रवाशांनी जणू गृहीत धरली आहे. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत लोणावळा-पुणे या मार्गावर दर अर्ध्या तासाला लोकल असणे आवश्यक आहे. प्रवाशांची तशी मागणी आहे. लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत असून, यातून रेल्वे प्रशासनाला महसूलही चांगला मिळत आहे. रेल्वे प्रशासन या मार्गावर लोकलच्या फेºया वाढवणे तर दूरच पण उत्पन्नाचे कारण दाखवत सुरू असलेल्या काही लोकल बंद करीत आहेत. प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास मोठी किंमत मोजावी लागू शकेल, असे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड