शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

थोडाफार दिलासा! पिंपरीत दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:46 IST

फेब्रुवारीपासून रुग्णवाढीस सुरुवात, तर मार्चमध्ये उच्चांक

ठळक मुद्देमागील चार दिवसात ७ हजार ५०८ रुग्णांची नोंद, तर १० हजार १८७ कोरोनामुक्त

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मागील चार दिवसांपासून  दैनंदिन रुगसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

शहरात मागील चार दिवसात ७ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार १८७ कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात रोज सरासरी दहा हजार तपासण्या करण्यात येत आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. शहरात सद्यस्थितीत २२ हजार ३११ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर मध्ये ८ हजार ६६१ रुग्ण दाखल आहेत. तर १३ हजार ५७० रुग्ण गृहवीलगीकरणात उपचार घेत आहेत. 

शहरात फेब्रुवारी पासून रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. मार्च मध्ये रुग्ण संख्येने उच्चाक गाठला. मार्च मध्ये एकूण ३४ हजार ८९ रुग्ण आढळून आले होते. एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक वाढ होती. तर याच महिन्यात १६४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही रुग्ण वाढ एप्रिल मध्ये सुरू राहिली. परंतु एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्ण संख्या हळूहळू कमी होत गेली.  या महिन्याच्या शेवटी दैनंदिन रुग्ण संख्येचा आलेख कमी होवून कोरोना मुक्तांची संख्या वाढली आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनेने संसर्गाची साखळी तुडण्यासाठी जे निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना संसर्ग रोखण्यात यश आले आहे.मृत्यू मात्र वाढले 

शहरात मार्च तुलनेत एप्रिल मध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत रुग्ण संख्या जरी काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. शहरात मागील चार दिवसात २२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.मागील काही दिवसांची आकडेवारी तारीख            रुग्ण            बरे झालेले २५ एप्रिल        २२६५              २०२७ २६ एप्रिल        १२९३              २४६९ २७ एप्रिल        १९८५              २३७६ २८ एप्रिल        १९५६              ३३१५   एकूण           ७५०८            १०१८७

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस