शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नवोदितांना वाद्यवादनाचे दिले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:41 IST

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले.

पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले. यामध्ये जलतरंग, तबला, सतार, सनई, सुंद्री, व्हायोलिन यांसारख्या वाद्यांची माहिती दिली.जलतरंग या वाद्याविषयी बोलताना पंडित मिलिंद तुळणकर म्हणाले, जलतरंग हे खूप जुने वाद्य आहे. यासाठी विशिष्ट प्रकारची भांडी निवडावी लागतात. यात वापरले जाणारे पाणीही चांगल्या प्रतीचेच लागते. बाऊलचा आकार जसा लहान होत जाईल तसा मंद्र सप्तकाचा अनुभव येतो. या वाद्याचा आनंद मुलांच्या विश्वाशी जोडण्यासाठी ‘लकडी की काठी, असावा सुंदर, दिल हैं छोटासा’ ही गाणी प्रत्यक्ष वाजवून दाखवली. राग गुजरी तोडी वाजवताना तबलावादक गणेश तानवडे यांच्या सोबतच्या जुगलबंदीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.सतारवाद्याविषयी माहिती देताना पं. सहाना बॅनर्जी म्हणाल्या, ‘सतार हे भारतीय वाद्यांतील मुख्य वाद्यांपैकी एक मानले जाते. मुघल काळातील पं. आमित खुसरॉ यांनी वीणा वाद्यात काही बदल करून सतार वाद्याची निर्मिती केली. पुढे त्यात काळानुरूप बदल होत गेले. घराणे पद्धतीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, ही संगीताची शिक्षण पद्धती आहे. यावरून संगीत सादरीकरण बदलत जाते. त्यानंतर त्यांनी ‘राग सारंग, एक तराना बंदिश आणि रघुपती राघव राजा राम’ ह्या भजनावर अतिशय तरल सतार वादन प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना विवेक भालेराव यांनी तबला संगत केली.पखवाज हे मृदंगाचे नवे रूप म्हणता येईल. स्वाती मुनींनी या वाद्याची निर्मिती केली असे म्हणतात, असे सांगत ज्ञानेश्वर देशमुख यांनी ताल चौताल उमेश पुरोहित यांच्या संवादिनी साथीने सादर केला.डॉ. प्रमोद गायकवाड यांनी सुंद्री व सनई ही वाद्ये सुशील वाद्य प्रकारात येत असून, अतिशय दुर्मिळ पारंपरिक वाद्यांपैकी मानली जातात असे सांगितले. याचा अनुभव घाशीराम कोतवाल या नाटकातील एक पद व राग सारंग वाजवून दिला. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. विकास कशाळकर यांनी केले. तर प्रस्तावना मधुरा लुंकड यांनी केली.