शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या; पिंपरीतील जिजामाता रुग्णालय प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 11:46 IST

महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप

ठळक मुद्देसंबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी

पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात हा प्रकार घडला. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज आठशे ते एक हजारावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. असे असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाबाबत तक्रारींमध्ये भर पडत आहे. या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी खासगी संस्थांना महापालिकेने कंत्राट दिले आहे. मात्र या संस्था निकृष्ट जेवण देत असल्याचे आरोप होत आहेत. 

बेचव असल्याने जेवण टाकून दिल्याचे प्रकार जिजामाता रुग्णालयामध्ये सातत्याने घडत आहेत. तेथील रुग्ण याबाबत तक्रार करीत आहेत. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व माकपतर्फे देखील महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यानंतरही जेवणाचा दर्जा सुधारण्यात आलेला नाही, असे आरोप होत आहेत. 

जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांना शनिवारी (दि. १५) जेवण देण्यात आले. त्यावेळी ताटामध्ये अळ्या आढळल्या. याबाबत रुग्णांनी तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांनी त्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. महापालिकेने जेवणाचे कंत्राट दिलेले ठेकेदार याला जबाबदार आहेत. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या शहर समितीचे सचिव गणेश दराडे यांनी केली आहे. 

............

जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळल्या किंवा कसे याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य कार्यवाही होईल तसेच दोषींवर कारवाई होईल.- अजित पवार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलfoodअन्न