शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘लालबत्ती’ खेळ विद्यार्थ्यांसाठी ठरतोय धोकादायक, ‘पोलीसकाका’ उपक्रमाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:00 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एका वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती. तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे अन्यथा हा खेळ विद्यार्थ्यांसाठी धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो.

- स्वप्निल हजारे ।पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये सध्या एका वेगळ्या खेळाची चर्चा होतेय. तो खेळ म्हणजे लालबत्ती. तुमचा पाल्य जर शाळेत जाऊन अशा प्रकारचा खेळ खेळत असेल, तर वेळीच त्याला सावध करण्याची आवश्यकता आहे अन्यथा हा खेळ विद्यार्थ्यांसाठी धोकादायक व जीवघेणा ठरू शकतो.पूर्वी तुम्ही-आम्ही गंमत म्हणून ‘लालबत्ती’ हा खेळ खेळला असाल. पण गंमत म्हणून खेळला जाणारा हा खेळ सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा छंद होऊलागला आहे. हा विद्यार्थ्यांचा खेळ तुमच्या पाल्याच्या जिवावरही बेतू शकतो. त्या विषयीची घटना नुकतीच कुदळवाडीतील एका खासगी शाळेत घडली. या खेळाच्या निमित्ताने एका विद्यार्थ्याला मित्रांनी जबर मारहाण केली. हे प्रकरण अगदी पोलीस चौकीपर्यंत गेले.खेळातील हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर या खेळातील गांभीर्य समोर आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना व शाळेला समज देऊन हे प्रकरण समुपदेशनाद्वारे हाताळले. आता हा जीवघेणा खेळ रोखण्यासाठी शाळा, पालक, तसेच पोलिसांनीही विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.काय आहे ‘लालबत्ती’ खेळ?या खेळात एका मुलाला लक्ष्य करून त्याच्या तोंडावर जर्किन वा स्वेटर टाकले जाते. मग दहा ते बारा मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. असा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडीतील एका खासगी शाळेत काही दिवसांपूर्वी घडला. या शाळेतील नववीत शिकणाºया एका मुलांला दहा ते बारा मित्रांनी मारहाण केली. त्यात तो जखमी झाला होता.‘पोलीसकाका’ उपक्रमाचे कौतुकपिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन ‘पोलीसकाका’ उपक्रम सुरू केला आहे. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जात आहे. सध्या या उपक्रमाचे अनेक शाळा, महाविद्यालयांनी स्वागत केले असून, पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी