Chinchwad Bypoll Election Result 2023: अश्विनी जगताप जिंकल्या; पण नाना काटे यांचा पराभव राहुल कलाटे यांच्यामुळे झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 10:10 PM2023-03-02T22:10:39+5:302023-03-02T22:11:58+5:30

Chinchwad Bypoll Election Result 2023: महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे राहुल कलाटे अपक्ष म्हणून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

know about who is shiv sena thackeray group rahul kalate lost chinchwad bypoll election 2023 | Chinchwad Bypoll Election Result 2023: अश्विनी जगताप जिंकल्या; पण नाना काटे यांचा पराभव राहुल कलाटे यांच्यामुळे झाला!

Chinchwad Bypoll Election Result 2023: अश्विनी जगताप जिंकल्या; पण नाना काटे यांचा पराभव राहुल कलाटे यांच्यामुळे झाला!

googlenewsNext

Chinchwad Bypoll Election Result 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. महाविकास आघाडीतील काटे-कलाटे मत विभागणीचा फायदा भाजपला झाला असून, चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली. 

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात होते. या पोटनिवडणुकीत नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली. या निवडणुकीत अधिक चर्चेचा विषय ठरलेले राहुल कलाटे कोण आहेत, ते जाणून घेऊया...

आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून ओळख

चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी शिवसेना गटनेते राहुल तानाजी कलाटे होत. त्यांचे दिवंगत वडील तानाजी कलाटे हे जिल्हा परिषद सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. तसेच त्यांची आई २००७ ते २०१२ या कालखंडात कमल कलाटे यांही महापालिकेत नगरसेविका होत्या. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरूवातीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. पुढे जगताप यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२०१९ मध्ये भाजपाला काटें की टक्कर दिली

२०१४ विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात ६३ हजार मते मिळविली होती. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगला स्रेहबंध आहे. त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून १ लाख १२ हजार ४४५ मते मिळविली. तसेच शिवसेना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी स्विकारली. तसेच २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत विजयी झाले. त्यानंतर महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडूण आले. त्यामुळे गटनेतेपद कलाटे यांना देण्यात आले. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांविरोधात बोलणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीसह विरोधीपक्षांची मोट बांधून अपक्ष निवडणूक लढविली. भाजपाला काटें की टक्कर दिली. 

दरम्यान, २०२३ च्या निवडणूकीत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर कलाटे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. ४४ हजार ११२ मते मिळविली आहेत. तसेच कमल प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आणि तानाजी कलाटे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

Web Title: know about who is shiv sena thackeray group rahul kalate lost chinchwad bypoll election 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.