शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 22:29 IST

आरोपींमध्ये टायगर ग्रुपच्या अध्यक्षासह होमगार्डचा समावेश

पिंपरी : गर्भपाताच्या गोळ्यांचे किट असलेले औषधांचे पाकीट दुकानात ठेवल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती दाखविली. तसेच धमकी देऊन पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. याप्रकरणी टायगर ग्रुपचा अध्यक्ष, होमगार्ड आणि ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यासह सात जणांना अटक केली आहे. वाकड येथे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक बेलीराम आगरवाल (वय ५३, रा. विकासनगर, किवळे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), राहुल छगन लोंढे (वय २४), प्रकाश मधुकर ससगाणे (वय ३१), ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०), कमलेश राजकुमार बाफना (वय ३२), संतोष बापू ओव्हाळ (वय २८, सर्व रा. वाकड) आणि होमगार्ड असलेला आकाश विजय हारकरे (वय २७, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने पोलीस काेठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संगनमत करून फिर्यादीच्या डांगे चौकातील स्पंदन मेडिकलमध्ये आले. पोलीस असल्याचे भासवून आरोपींनी मेडिकलमधील कपाटातील एमटीपी किट, औषधाचे पाकीट व दोन फाइल ताब्यात घेतल्या. या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्व हॉस्पिटलला येरवडा कारागृहाची हवा खावी लागेल, अशी भीती दाखविली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविले. दत्त मंदिर रोड, वाकड या परिसरात फिरवून फिर्यादी आणि डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच एका तासामध्ये पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.-----शहर पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. बंदोबस्त तसेच पोलिसांच्या विविध उपक्रमांमध्ये या दलाचे सदस्य सक्रिय असतात. त्यातीलच एका सदस्याने गंभीर गुन्हा केल्याचे समाेर आले आहे.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसMedicalवैद्यकीयKidnappingअपहरण