शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

नात्याला काळीमा; घटनांमध्ये वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:50 IST

पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. या नराधम पित्याने स्वत:च्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत नात्याला काळीमा फासणार्‍या घटनांत वाढ झाली आहे. 

ठळक मुद्देनातेवाईक, शिक्षकांकडूनच होतेय शोषण धमकावून गैरवर्तन; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कधी पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार केला जातो. तर कधी जवळच्या नातेवाइकांकडून, शाळेच्या शिक्षकांकडून व आश्रम शाळेतील काळजीवाहू व्यक्तींकडून लैंगिक शोषण होते. पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. या नराधम पित्याने स्वत:च्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत नात्याला काळीमा फासणार्‍या घटनांत वाढ झाली आहे. नववीत शिकणार्‍या या मुलीवर तिचे वडील मागील एक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते. घरात कोणी नसताना वडील तिच्यावर बळजबरी करायचे. अखेर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने मुलीसह भोसरी पोलीस ठाणे गाठले. तेथे नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना अगदी अलीकडची आहे. गेल्या महिन्यात दापोडी येथील अनाथाश्रमात ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाले. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना, याप्रकरणी आश्रमाच्या संचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. उलट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्याआगोदर वल्लभनगर येथील महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय या मराठी माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . २0१५ ते २0१७  या दोन वर्षांच्या कालावधित या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा सोडल्याचा दाखला हातात देईन, असे धमकावून तो विद्यार्थिनींशी गैरवर्तन करीत असे.

अमानुष अत्याचारवाकड येथील एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.  वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगवीत काही महिन्यांपूर्वी घडली आहे. केवळ सावत्र मुलीच नाही तर, पत्नीच्या बहिणीच्या नऊ वर्षांच्या मुलीवरसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला होता. 

वडिलांनी पोटच्या मुलीवर अत्याचार करणे, शिक्षकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे अशा प्रकारच्या नात्याला काळीमा फासणार्‍या घटना घडत आहेत. या घटना घडतात, त्यामध्ये विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा सहभाग असतो. विकृतीतून या घटना घडत असल्या, तरी आजूबाजूच्या लोकांनी अशा विकृत लोकांवर वेळीच नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ या उक्तीप्रमाणे नागरिकांनी सामाजिक भान जपले पाहिजे. एखाद्याच्या घरात काही वेगळेच सुरू आहे. त्याकडे आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष न करता त्यात लक्ष दिले पाहिजे. असे प्रकार वेळीच रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वांनी सजगता दाखविली पाहिजे. सामाजिक भान दाखविल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकेल.    - गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन.-

टॅग्स :Crimeगुन्हा