शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील कळकराई गाव अर्धे अंधारात; ८ महिन्यांपासून वीज बंद, महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:11 IST

अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे.

ठळक मुद्देमहावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल नाहीअंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत बिल येत असून ते घरपोचही पोहचवले जात नाही

कामशेत : अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. या भागात वीज रिडींग घेण्यासाठी वीज बिल देण्यासाठी कोणीही येत नसून बिल हे अंदाजे मिळत आहे. याविषयी महावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थ तक्रार करीत आहेत. कळकराई गावाकडे जाण्यासाठी अंदर मावळातील सावळा येथून मार्ग असून या दुर्लक्षित गावाला अजूनही रस्ता नाही. कळकराई मध्ये मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी वीज पोहचली आहे. गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून गावात आलेल्या दोन वीज लाईन वर हे कनेक्शन आहेत. मात्र या दोन लाईन पैकी एक लाईन अद्यापही बंद आहे. त्यामुळे कळकराई हा अर्धा गाव अंधारात आहे. या लाईन ला काय बिघाड आहे हे महावितरण कर्मचाऱ्यांच्या अजूनही लक्षात आले नाही. त्यामुळे दुरुस्ती रखडली आहे. तर दुसरी लाईन वरून होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाचा होत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात पीठ गिरणी असूनही विजे अभावी महिलांना डोक्यावर दळणाचे ओझे घेऊन दोन तासांनी पायपीट करून चार किलोमीटर चा घाट चालून दळणा साठी वणवण करावी लागत आहे अशी माहिती चंद्रकांत कावळे यांनी दिली. या गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून आजपर्यंत वीज मीटर रिडींग नेण्यासाठी येथे कोणीच फिरकले नाही. येथील सवार्नाच महावितरण मंडळाकडून अंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत वीज बिल येत असून ते बिल घरपोच पोहचवले ही जात नाही. वीज सुरू नसतानाही आपली वीज कनेक्शन कट होऊ नये, शिवाय पुढील बिलात वाढीव बिल लागून येऊ नये आदी कारणांच्या भितीमुळे हे ग्राहक कुरबुर न करता लाईट बंद असतानाही वेळी अवेळी येणारी वीज बिल भरत आहेत. वीज वितरण कार्यालय व वायरमन याना वारंवार फोन करून भेटून समस्या मांडली तरी कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या भागातील विजेची समस्या सुटावी म्हणून आग्रहास्तव आलेल्या एका वायरमनने प्रत्येका कडून पन्नास शंभर असे पैसे घेतले मात्र त्या नंतर तो या भागात परत फिरकलाच नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड