शहरं
Join us  
Trending Stories
1
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
3
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
4
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
5
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
6
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
7
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
8
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
9
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
10
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
11
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
12
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
13
ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'
14
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर
15
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
16
पाकिस्तानच्या बाबरच्या राजीनाम्याची मागणी; पण त्याच्या समर्थनार्थ भारतीय दिग्गज मैदानात
17
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
18
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
19
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
20
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ

पीएमपीचा प्रवास बनतोय धोकादायक, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:25 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला आग लागण्याच्या घटनांसह रस्त्यातच बंद पडण्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मंगेश पांडे ।पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला आग लागण्याच्या घटनांसह रस्त्यातच बंद पडण्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशा धोकादायक स्थितीत आणखी किती दिवस प्रवास करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड व लगतच्या प्रवाशांसाठी पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. खासगी वाहनांचा वापर न करता अनेकजण सार्वजनिक वाहतुकीला पसंती देतात. मात्र, हवी तशी सेवा मिळत नसल्याने प्रवाशांकडून पीएमपीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.पीएमपी बस अनेकदा रस्त्यातच बंद पडतात. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. दुसºया बसमध्ये बसवून देईपर्यंत प्रवाशांचा वेळ वाया जातो. यासाठी बस मार्गावर सोडतानाच बसची व्यवस्थित तपासणी करूनच सोडणे गरजेचे आहे.मागील दोन महिन्यांत बसला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सीएनजी बसचे प्रमाण अधिक आहे. यासह बस थांब्यांवर वेळेचे नियोजन पाळले जात नाही. बस सुटण्याची वेळ होऊन गेली तरीही वाहक मनमानी पद्धतीने बस थांबवून ठेवतात. याबाबत प्रवाशाने विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.>प्रवाशांकडूनच बसला धक्काअनेकदा नादुरुस्त बस मार्गावर सोडल्या जातात. मार्गावर धावण्यासाठी बस सक्षम नसतानाही मार्गावर सोडल्या जात असल्याने अशा बस रस्त्यातच बंद पडणे, अपघात होणे अशा घटना घडत आहेत. मार्गावर ठिकठिकाणी बस बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळते. बंद पडलेल्या बसला धक्का मारायचा असल्यास बसमधील प्रवाशांनाच धक्का मारायला सांगितले जाते. यामुळे प्रवासी संताप व्यक्त करतात. मात्र, इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांकडे पर्याय नसल्याने धक्का मारावा लागतो.>शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटनाअंतर्गत वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्यास आगीच्या घटना घडतात. यापूर्वीही बसला आग लागण्याच्या घटना शॉर्टसर्किटमुळेच घडल्या आहेत. दरम्यान, दर दहा दिवसांनी बसची सर्व्हिसिंग केली जाते. मार्गावर बंद पडणाºया बसमध्ये जुन्या बसचा समावेश असल्याचे दिसून येते. त्यामुळे जुन्या बस कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने टप्प्याटप्प्याने सुमारे दोनशे मिडीबस मार्गावर येत असल्याने जुन्या बसची संख्या कमी होईल. यामुळे बस बंद पडण्यासह दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल, असे पीएमपीचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.>...झाले बसचे ब्रेक निकामीस्वारगेटहून निगडीला जाणाºया पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फुगेवाडी येथे बस रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला धडकली. बसचे मोठे नुकसान झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला त्यांनी बस धडकवली. बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. बसच्या पुढील भागाचे मात्र नुकसान झाले.>८ मार्च २०१८एचए कंपनीसमोर पुण्याहून निगडीच्या दिशेने जाणारी बस रस्त्यातच बंद पडली. यामुळे बसमधील प्रवाशांना खाली उतरून दुसºया बसने जावे लागले.>९ मार्च २०१८मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी आलेल्या पीएमपी बसला अचानक आग लागली. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले. त्या वेळी बसमध्ये प्रवासी नव्हते.>२६ फेबु्रवारी २०१८पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी -किवळे मार्गावर धावणारी पीएमपी बस २६ फेब्रुवारी देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी झाली. यामध्ये चालक, वाहकासह आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले.>१२ फेबु्रवारी २०१८पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर निगडीहून पुण्याकडे जाणाºया पीएमपी बसने अचानक पेट घेतला. बसगाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसच्या पुढील भागातून इंजिनाजवळून धूर येऊ लागला. या प्रकारामुळे निगडीवरून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली.