शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठी पाच कोटींचे टूल खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 16:20 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू

ठळक मुद्देरेफ्रिजीरेटर अभ्यासक्रमासाठी ५ कोटींचे टूल किटया व्यवसाय अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्यात येणारया साहित्यासाठी महापालिकेने ४ कोटी ९९ लाख रुपये अंदाजपत्रकीय दर सादर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रेफ्रिजीरेटर आणि वातानुकूलित मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे टूल किटसाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. या आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांसह रेफ्रिजीरेटर आणि वातानुकूलित यंत्रणा, मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमही शिकविला जात आहे. या व्यवसाय अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेला टूल्स किट, इक्विपमेंट आणि यंत्रणा आदी विविध साहित्यांची आवश्यकता आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मध्यवर्ती भांडार विभागातर्फे ई-निविदा प्रसिद्ध केली होती. या साहित्यासाठी महापालिकेने ४ कोटी ९९ लाख रुपये अंदाजपत्रकीय दर सादर केला होता. त्यावर साकेत एंटरप्राईजेस, इंद्रनिल टेक्नॉलॉजी आणि सी. सी. इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यातील सर्वाधिक कमी दराची म्हणजे ५.७६ टक्के कमी दराची निविदा इंद्रनिल टेक्नॉलॉजी या संस्थेने सादर केली.त्यांनी आयटीआयमधील रेफ्रिजीरेटर अँड  एअर कंडिशनिंग मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी आवश्यक विविध प्रकारच टूल्स किट, इक्विपमेंट आणि मशिनरी आदी विविध साहित्य ४ कोटी ७० लाख २२ हजार ७०४ रुपयांमध्ये देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच करारनामा करण्यात येणार असून, आवश्यक विविध प्रकारचे टूल किट खरेदी करण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडiti collegeआयटीआय कॉलेज