शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडी प्रमुखांना भेट म्हणून दिलेल्या विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 15:15 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना २०१६ मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली.या मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता...

ठळक मुद्देलेखापाल, कारकुनाची रोखली वेतनवाढ भ्रष्टाचार तक्रारीच्या अनुषंगाने द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याची समज

पिंपरी : आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी प्रकरणात आर्थिक गैरव्यहार झाला नसल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. अनियमितता प्रकरणी लेखापाल आणि कारकुनाची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखून ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना २०१६ मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली. या मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित विभागातील लेखापाल प्रवीणकुमार देठे आणि भगवंता दाभाडे यांची ११ नोव्हेंबर २०१६ रोजी विभागीय चौकशी सुरू झाली. ७ एप्रिल २०१८ रोजी दोघांच्याही खातेनिहाय चौकशीचा अहवाल प्राप्त झाला. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार झाले नसल्याचे स्पष्ट झाले होते. चौकशीत अनियमितता असल्याचे उघड झाले आहे. भांडार विभागाचे लेखापाल प्रवीणकुमार शिवराम देठे आणि कारकून भगवंता धोंडिबा दाभाडे यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले होते. मात्र, देठे आणि दाभाडे यांनी आपल्यावर ठेवलेले दोषारोप अमान्य केले. मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहायक आयुक्तांनी २ जानेवारी २०१९ रोजी अभिप्राय सादर केला. त्यामध्ये मूर्ती खरेदीप्रकरणात अनियमितता झाली असली, तरी पुरवठाधारकाच्या बिलांची पूर्तता होऊन प्रकरणाचा निपटारा झाला आहे. यात महापालिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. विभागप्रमुखांचा अहवाल, खातेनिहाय चौकशीतील दोषारोप विचारात घेता देठे आणि दाभाडे यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नियमातील तरतुदीनुसार, देठे आणि दाभाडे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रीतीने तात्पुरत्या स्वरूपात रोखून ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. यापुढे कोणत्याही स्वरूपाच्या कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याची समज देण्यात आली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshadhi Ekadashiआषाढी एकादशी