शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी रोखण्यासाठीचे ‘अदृश्य पोलिसिंग’ अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:12 IST

उद्योगनगरीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्षे झाले. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे

ठळक मुद्देगुन्हेगारी रोखण्यासाठीचे ‘अदृश्य पोलिसिंग’ अधांतरीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय । उपक्रम राबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नारायण बडगुजरपिंपरी : उद्योगनगरीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्षे झाले. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ‘अदृश्य पोलिसिंग’ करणार असल्याचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हा उपक्रम राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अभिनव उपक्रम असूनही तो दृष्टीपथात आलेला नाही. पोलिसांच्या प्रतिसादावर गुन्ह्याचे स्वरूप बदलत जाते. त्यासाठी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे कमी होतील. यातून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही केल्या. त्यानुसार माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल होण्यास सुरुवात झाली. असे असले तरी ‘अदृश्य पोलिसिंग’ म्हणजे काय, ते कसे फायदेशीर आहे, याबाबत सर्वसामान्यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे नागरिकांचा यात सहभाग असल्याचे दिसून येत नाही. पोलिसांना माहिती देण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाहीत. त्यासाठी त्यांच्यात तसा विश्वास निर्माण करण्यात पोलिसांना अद्याप अपेक्षित यश आलेले नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, नागरी भाग आणि एमआयडीसी असा संमिश्र परिसर असल्याने ‘भाईगिरी’ वाढली आहे. घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार, फसवणूक, वाहनांची तोडफोड आदी गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाययोजना करण्याचे जाहीर केले. असे होते अदृश्य पोलिसिंग1 शहरात घडणाऱ्या  विविध गुन्हेगारीच्या घटना, घडामोडींबाबत नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहिती कळवावी, त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी ही नवीन योजना आखली होती. अर्थात पोलीस समोर नसले तरी कारवाई होईल, असे नमूद केले. यासाठी जनजागृती करण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात जागृती झाली नाही. 2 आयुक्तालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही, याबाबत आयुक्तांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. विविध विभागांसाठी अधिकारी व कर्मचारी असे सुमारे साडेचार हजार मंजूर पदे आहेत. त्यातील सुमारे अडीच हजार अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. सुमारे दोन हजार पदे रिक्त आहेत. 3 पोलिसांवरील ताण कमी होण्यासाठी ‘अदृश्य पोलिसिंग’ फायदेशीर आहे. तसेच गंभीर स्वरुपाचे गुन्हे कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र या उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी