शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस शोधताहेत सावज, व्हॉट्सअ‍ॅपवरून कारवाईबाबत उलट-सुलट संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:08 IST

आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले आहेत. मार्च अखेर असल्याने चौका-चौकांत वाहतूक पोलीस दबा धरून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दक्षता म्हणून वाहन परवाना तसेच अन्य कागदपत्रे जवळ बाळगली तरी काही त्रुटी निघते का? हे पाहून वाहनचालकांकडून सक्तीने दंड वसुली केली जात आहे.

पिंपरी  - आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले आहेत. मार्च अखेर असल्याने चौका-चौकांत वाहतूक पोलीस दबा धरून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दक्षता म्हणून वाहन परवाना तसेच अन्य कागदपत्रे जवळ बाळगली तरी काही त्रुटी निघते का? हे पाहून वाहनचालकांकडून सक्तीने दंड वसुली केली जात आहे. त्यांचे मार्च अखेरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना दंडाचा भूर्दंड लादला जात असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मॅसेज व्हायरल झाले आहेत.पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी कधी नव्हे इतके वाहतूक पोलीस अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. मार्च सुरू होताच, त्यांची दंड वसुलीची मोहीम अधिक तीव्र झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड झाला पाहिजे, यात कोणाचे दुमत नाही. परंतु वाहनचालक कधी चूक करतोय, त्याला आपण कधी पकडतोय अशा पद्धतीची वाहतूक पोलिसांची कारवाईची मोहीम अन्यायकारक ठरणारी आहे. शहराबाहेरून आलेली एखादी व्यक्ती वाहन घेऊन चुकून नो एंट्रीच्या मार्गावर आल्यास तेथील वाहनचालकाने रस्ता चुकलेल्या वाहनचालकाला कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. एकीकडे पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी आणि मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. बॅरिकेडस लावल्याने शहरात राहणाºया लोकांनाही मार्गात कोठे बदल झाला, हे माहीत नसते, त्यांना माहिती नाही, याचा गैरफायदा उठविला जात आहे.पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल, एच ए कंपनी जवळील भुयारी मार्ग, मोरवाडी चौक, आुकर्डी, निगडी येथे वाहनचालकांना अडवून विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते.रिक्षा : मुदत संपूनही धावताहेत रस्त्यावरवाहतूक पोलिसांचा हा एक प्रकारे वाहनचालकांना जाच वाटू लागला आहे. परमिट नसलेल्या हजारो रिक्षा शहरात प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशा रिक्षांवर कारवाई होत नाही. अशा रिक्षांवर कारवाई झाल्यास रिक्षा रस्त्यावर धावूच शकणार नाहीत. परमिट नसलेल्या मुदतबाह्य अशा रिक्षा राजरोसपणे धावत आहेत. खºया अर्थाने कारवाईची मोहीम राबवायची तर अशा अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत़ तसेच पोलिसांच्या एकतर्फी कारवाईबद्दल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वाहनचालकांचे काही जण प्रबोधन करू लागले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस