शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 05:11 IST

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे.

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले जाणार आहे.लाडक्या गणरायाचे आगमनासाठी सर्वांचीच जोरदार तयारी सुरू आहे. विशेषत: सार्वजनिक मंडळांकडून योग्य नियोजन केले जात आहे. अवघे चारच दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, रहाटणी, मोशी, वाकड, थेरगाव या भागात पन्नासहून अधिक वर्षे झालेली जुनी मंडळे आहेत. काही मंडळांनी मूर्तींच्या भव्य देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे, तर काही मंडळे जिवंत देखावे सादर करणार आहेत.भारत-चीन परिस्थिती, जीएसटी, व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणाई, मोबाइलचा अतिवापर, पालक-मुलांमधील विसंवाद आदी विषयांवर देखावे सादर केले जाणार आहे. यामध्ये जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कलाकारांना घेऊन देखावा उभा केला जात आहे. यामुळे स्थानिक कलाकारांनाही कलागुण सादर करण्यास वाव मिळत आहे. ज्वलंत विषयावर देखावे सादर करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी मंडळांनी देखाव्याच्या कॅसेट तयार करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी वेगवेगळे आवाजही दिले जात आहेत.सध्या ठिकठिकाणी मंडप उभारणीचे कामकाज सुरू आहे. शेड उभारणी झाली असून अधिकची सजावटही केली जात आहे.कार्यकर्त्यांची लगबगमूर्तीच्या देखाव्यांऐवजी जिवंत देखावे सादर केले जात आहेत. आपला देखावा अधिक सरस व्हावा यासाठी देखाव्याचे कथानकावर अधिक अभ्यास केला जात आहे. चालू घडामोडींसह विनोदी शैलीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळांकडून केला जात आहे. कोणता देखावा असावा, किती पात्र असावेत, संवाद कोणते असावेत आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. यासह सराव करण्यासाठीही जोरदार तयारी सुरू आहे.पहिल्या दिवशी देखाव्याचे नियोजनयंदा १२ दिवस गणेशोत्सव आहे. त्यामुळे गणरायाची भक्ती करण्यासह देखावा सादर करण्यासदेखील १२ दिवस मिळणार आहेत. शहरातील काही भागात सात दिवसांचे, तर काही भागात नऊ दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे या भागातील कार्यकर्ते प्रतिष्ठापनेच्या पहिल्या दिवशीच देखावा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव