शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 05:16 IST

कॉल आला की तातडीने घटनास्थळी जावा, वेळेवर न गेल्यास जादा कवायतीची शिक्षा अशी पद्धत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अवलंबिली आहे. पण रिस्पॉन्स टीमला आवश्यक वाहनांसह इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत.

- मंगेश पांडेपिंपरी : कॉल आला की तातडीने घटनास्थळी जावा, वेळेवर न गेल्यास जादा कवायतीची शिक्षा अशी पद्धत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अवलंबिली आहे. पण रिस्पॉन्स टीमला आवश्यक वाहनांसह इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना घटनास्थळी जाण्यास उशीर होतोे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘सुविधांचा शिमगा; तरीही जादा कवायतीच्या शिक्षेची धुळवड’ अशी स्थिती आहे.नागरिकांना तातडीने मदत मिळावी, पोलिसांची कुमक तातडीने घटनास्थळी पोहोचावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक ठाण्यात विशेष टीम स्थापन केल्या. मात्र, पोलीस पथकाला घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी वाहनच उपलब्ध होत नाही. दरम्यान, हे पथक कॉल देऊनही वेळेत पोहोचले नाही, तर आयुक्तांच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागत असल्याने पोलीस कर्मचारी कात्रीत सापडले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ आॅगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाययोजना राबविल्या. तातडीच्या मदतीसाठी एखाद्या नागरिकाने नियंत्रण कक्षात फोन केल्यास त्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दिवस-रात्री सहा ते सात ‘रिस्पॉन्स टीम’ स्थापन केल्या. त्यात सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, ठाण्यांतर्गत असलेल्या चौकीनिहाय या टीम काम करतात. तसेच काही टीम पोलीस ठाण्यातही असतात.कॉलची माहिती मिळाल्यानंतर ही टीम तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीला मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कॉल आल्यानंतरही काही टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिंचवड येथील आयुक्तालयात बोलावून आयुक्तांनी ज्यादा कवायतीची शिक्षा केली.गेल्या काही दिवसांत दोन ते तीन वेळा याप्रकारची शिक्षा पोलिसांना देण्यात आली. मात्र, कॉल आल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे पोलीस कर्मचाºयांचे म्हणणे आहे.रिस्पॉन्स टीमला मिळेना वाहनसध्या प्रत्येक ठाण्याला एक अथवा दोनच सरकारी चारचाकी वाहने उपलब्ध आहेत. या दोन वाहनांपैकी एक वाहन वरिष्ठ निरीक्षकांसाठी असते. तर दुसरे वाहन आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी अथवा इतर कामकाजासाठी असते. दरम्यान, रिस्पॉन्स टीमला एखादा कॉल आल्यास वाहनाच्या उपलब्धतेअभावी घटनास्थळी वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. अथवा खासगी वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचावे लागते. दरम्यान, वाहन उपलब्धतेअभावी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला तरी त्याचा ठपका पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवरच ठेवला जातो. त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.स्लो रिस्पॉन्स टीमला शिक्षानागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘रिस्पॉन्स टीम’ची स्थापना केली आहे. मात्र, या टीमकडून काही वेळेस ‘स्लो रिस्पॉन्स’ मिळत असल्याने नागरिकांना वेळेत मदत मिळत नाही. दरम्यान, अशाप्रकारे ‘स्लो रिस्पॉन्स’ देणाºया पोलीस कर्मचाºयांना आठवडाभरात दोन ते तीनवेळा ज्यादा कवायतीची शिक्षा देण्यात आली.कर्मचाºयांना करावा लागतोय गैरसोयीचा सामनास्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यानंतर शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आयुक्तांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या. मात्र, या संकल्पना राबविताना व त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना आवश्यक असणाºया सुविधाही पुरविणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Policeपोलिस