शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार मूलभूत सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 15:45 IST

हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट

ठळक मुद्देपोलिसांकडून उपाययोजना : आढावा समितीची स्थापना 

पिंपरी : हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर पिंपरी -चिंचवड पोलिसांकडून शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी (दि. ९) पोलीस आयुक्तालयात झाली. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी तयार केलेल्या आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. तसेच महाराष्ट्रातही बाललैंगिक अत्याचाराचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी महिलांच्या सुरक्षेवर भर दिला आहे. महिला सुरक्षीततेच्या दृष्टीने मुलभूत सुविधांचा आढावा या वेळी घेण्यात आला. शहरातील निर्जन स्थळांवर ह्यवॉचह्ण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पुरेशा प्रकाशासाठी पथदिवे उभारण्यात येणार आहे. रिक्षांवर महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक तसेच महिलांचा सन्मार करण्यासाठी एक सूविचार नमूद करण्यात यावा, त्याबाबत वाहतूक विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ओला, उबेर यांसारखी खासगी प्रवासी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल. या प्रतिनिधींना बैठकीत महिला सुरक्षेविषयी सूचना देण्यात येतील. लैंगिक अत्याचाराचे प्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी लैंगिक अत्याचाराचे तांत्रिक गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांतील आरोपींची यादी करण्यात येईल. एकापेक्षा जास्त लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिसांकडून ह्यवॉचह्ण ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. महिलांना भयमुक्त वातारणासाठी शहरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

...............महिलांच्या सुरक्षेसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आढावा समितीची स्थापना केली आहे. यात स्थानिक पातळीवरील यंत्रणांचा सहभाग असून, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. - संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाhyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिस