शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ind vs Ban: बाराशेचे तिकीट तब्बल १२ हजारांना, काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

By नारायण बडगुजर | Updated: October 19, 2023 17:35 IST

तिकिटे पुरवणारा त्यांचा साथीदार युनुस शेख याच्या विरोधात देखील पोलिसांनी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.....

पिंपरी : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे १२०० रुपयांचे तिकीट १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गहुंजे येथे शुक्रवारी सामना झाला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रावेत येथील मुकाई चौकात बुधवारी (दि. १८) रात्री ही कारवाई केली. रवी लिंगप्पा देवकर व अजित सुरेश कदम, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना तिकिटे पुरवणारा त्यांचा साथीदार युनुस शेख याच्या विरोधात देखील पोलिसांनी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी झाला. त्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेतली. साध्या वेशातील पोलिस काही दिवसांपासून गहुंजे मैदान परिसरात गस्तीवर आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, रावेत येथील मुकाई चौकात काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लावून रवी देवकर आणि अजित कदम यांना ताब्यात घेतले. दोघांकडे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची १२०० रुपये दराची पाच तिकिटे आढळली. यातील एक तिकीट ते १२ हजार रुपयांना विकत होते. पोलिसांनी पाच तिकिटे, ३८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात हजार रुपयांची रोकड, असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला. रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने तिकिटे पुरवल्याचे तपासात समोर आले.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.   

काळ्या बाजारातून तिकिट खरेदी-

गहुंजे मैदानात विश्वचषकातील पाच सामने होणार आहेत. त्यातील पहिला सामना गुरुवारी झाला. भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमधील या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी होती. या मैदानावरील उर्वरित चार सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या सामन्याचा समावेश नाही. त्यामुळे गुरुवारच्या सामन्याच्या तिकिटांना मागणी होती. जास्तीचे पैसे देऊन काळ्याबाजातारातून तिकिटे खरेदी केल्याचे अनेकांनी सांगितले.

टॅग्स :cricket off the fieldऑफ द फिल्डPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड