शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड सहायक आयुक्तांचे अधिकार वाढविले; कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 13:23 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत.

ठळक मुद्देनिर्णय घेण्याकरिता प्रकरण वरिष्ठांकडे सादर करणे हे कर्तव्यातील दुर्लक्ष समजण्यात येणारसंबंधित अधिकार्‍याच्या गोपनीय अहवालात घेण्यात येईल नोंद

पिंपरी : कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कर्मचार्‍यांच्या दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, चौकशी अधिकारी नेमणूक करणे, नियुक्ती किंवा पदोन्नती नियमित करणे तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार, अनुकंपा तत्वावर वारस नियुक्तीबाबत मान्यता देण्याबाबतचे प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत.   पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या दुय्यम अधिकार्‍यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकार सोपवू शकतात. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी काही अधिकार्‍यांना प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान केले आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने काही अधिकार नव्याने प्रदान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना काही अधिकार प्रदान केले आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि नागरी सेवा नियुमानुसार, ब, क आणि ड श्रेणी संवर्गातील दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, सादरकर्ता व चौकशी अधिकारी नेमणूक करणे, कर्मचार्‍याचा परिविक्षाधीन कालावधी वाढविणे, नियुक्ती किंवा पदोन्नती नियमित करणे याशिवाय लाड समितीच्या शिफारशीनुसार, वारस नियुक्ती, अनुकंपा तत्वावर वारस नियुक्तीबाबत मान्यता देऊन आदेश जारी करणे, दर १५ दिवसांनी अशा जारी केलेल्या आदेशांची यादी आयुक्तांच्या अवलोकनार्थ ठेवणे असे प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत.प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी प्रदान केलेले अधिकार वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय, नि:पक्षपातीपणे वापरावेत. अधिकार प्रदान केले असताना निर्णय घेण्याकरिता प्रकरण वरिष्ठांकडे सादर करणे हे कर्तव्यातील दुर्लक्ष समजण्यात येणार आहे. याची संबंधित अधिकार्‍याच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्त