शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

मावळात वाढला पावसाचा जोर : धुवाधार पावसाने पूल गेले पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 01:22 IST

मावळासह कामशेत परिसरात पावसाने चांगलीच ओढ दिल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून जोरात सुरुवात केली आहे.

कामशेत - मावळासह कामशेत परिसरात पावसाने चांगलीच ओढ दिल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून जोरात सुरुवात केली आहे. यामुळे सांगिसे, जुना नाणे रोड, सांगवडे येथील पूल पाण्याखाली गेले. तसेच पुसाणे येथील सांडव्यावरून पाणी गेले. यामुळे दळणवळण ठप्प झाले.कुंडलिका व इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून, इंद्रायणी नदीवरील जुना नाणे पूल पाण्याखाली गेला आहे. कामशेत परिसरात मागील दोन दिवसांमध्ये १३२ मिमी पाऊस झाला असल्याची माहिती खडकाळा बीज गुणन प्रक्षेत्र कृषी विभागाने दिली.कामशेत शहरासह मावळातील अनेक भागांत दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होते. पण या वेळी पावसाने जास्तच ओढ देऊन सर्वांचे डोळे आभाळाकडे लावले होते. भात उत्पादक शेतकरी वर्ग धास्तावला होता. एकीकडे यावर्षी पाऊस जास्त होणार असे बोलले जात होते, तर दुसरीकडे मावळात पाऊस सुरू व्हायचे नाव घेत नव्हता. यामुळे नागरिकांची शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. शेतीची सर्व कामे खोळंबली होती. पण जुलै महिन्यापासून शहरासहीत मावळातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावून सर्वांना सुखावले. तीन ते चार दिवसांत पावसाचा चांगलाच जोर वाढला असून, शेतात व ठिकठिकाणी पाणी साचले आहे. नाणे मावळाकडे जाणाºया नाणेरोड वरील इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहायला लागली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसाची संततधार सुरू असतानाच मागील तीन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. मावळातील सर्वच भागात पावसाला सुरुवात झाली असून, इंद्रायणी दुधडी भरून वाहू लागली आहे. नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले. इंद्रायणी नदीचे पात्र काठोकाठ भरले आहे. वाहून आलेल्या जलपर्णी जुन्या पुलाच्या कठड्यांना अडकल्या आहेत. नदीचे पाणी अलीकडे कामशेत शहराची स्मशानभूमीच्या पाय-यांना लागले असून, पलीकडे नाणे गावच्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. नाणेरोडच्या बाजूने असणाºया मोºया तुडुंब भरून वाहत आहेत.कामशेतमधून लोणावळ्याकडे जाणारा महामार्गाला जोडणाºया शायीरी भागातील रस्त्यावर पाणी साचले असून, या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेष करून खामशेत, पाथरगाव, वाडीवळे भागातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरील पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस