शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने ‘हापूस’ आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:24 IST

पिंपरी बाजारपेठ : पायरी, लालबाग आंबा झाला दाखल

पिंपरी : शहरात दोन आठवड्यांपूर्वी हापूस आंबा दाखल झाला. मात्र अपेक्षित आवक नसल्याने हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र काही दिवसांपासून फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर स्थिरअसून, ठिकठिकाणी आंब्याचे स्टॉल दिसत आहेत.

शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारच्या आंब्याची आवक सुरू होते. कर्नाटकातील बदाम, लालबाग व पायरी यासह विविध जातींचे आंबे दाखल झाले होते. त्या वेळी काही ठिकाणच्या हापूस आंब्याची आवकही सुरू झाली होती. मात्र आवक कमी असल्याने दर अधिक होते. मागील आठवड्यापासून येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आंब्याची आवक वाढू लागली आहे. सध्या बाजारात हापूस आंब्याला पाचशे ते एक हजार रुपये डझन असा भाव मिळत आहे. सुरुवातीला ३५० रुपये किलो असलेला बदाम आंबा ८० ते १२० रुपये किलोवर आला आहे. पायरी १६० व लालबाग आंब्याची ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.सध्या हापूस आंब्याबरोबरच बदाम आंब्यालाही ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. यावर्षी सुरुवातीच्या काळात बदाम आंब्याचा दरही ४०० रुपये किलो होता. मात्र आता कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतून आंब्याची आवक झाल्याने आंब्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बदाम आंब्याची गोडी वाटत आहे.आंबे खरेदीकडे कल वाढला आहे. गुढीपाढव्यानंतर अधिक आवक सुरू होईल. त्यानंतर यापेक्षा दर कमी होतील. वातावरणामध्ये काही बदल झाला किंवा अवकाळी पाऊस झाला तर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पुन्हा आंब्याचे भाव वाढतील.- कुमार शिरसाट, फळविक्रेते. 

टॅग्स :MangoआंबाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड