बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर बलात्कार; इंजिनीअर तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:44 AM2022-01-25T10:44:01+5:302022-01-25T10:44:14+5:30

इंजिनीयर तरुणाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

in pimpari Engineer girl raped after birthday party case filed against engineer youth | बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर बलात्कार; इंजिनीअर तरुणावर गुन्हा दाखल

बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर बलात्कार; इंजिनीअर तरुणावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर इंजिनिअर तरुणाने तिच्याशी मैत्री करून बर्थडे पार्टीला बोलावून बलात्कार केला. भुमकर चौक, हिंजवडी येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली. 

निशांत हरीश चंदनानी (वय ३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने सोमवारी (दि. २४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनीअर असून ती घटस्फोटित आहे. त्याच प्रमाणे आरोपी देखील इंजिनिअर असून घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणी सोबत ओळख केली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादी सोबत बलात्कार केला. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करणारे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: in pimpari Engineer girl raped after birthday party case filed against engineer youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.