शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘जार’मधील अशुद्ध पाणी शहरातील नागरिकांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 00:48 IST

शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

- प्रकाश गायकर पिंपरी : शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा शहरामध्ये जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शहराच्या गल्ली बोळामध्ये थंड पाण्याच्या जारची दुकाने थाटलेली दिसत आहेत.कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प रावबून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने विशाल रूप धारण केले आणि त्यातील शुद्धता हरवली. आता भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्ली-बोळामध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच, त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही.महापालिकेचा पाणीपुरवठा व बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करून ते थंड केले जाते. ते पाणी जारमध्ये भरून त्याची ४० ते ५० रुपये दराने विक्री केली जात आहे. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या यासाठी नागरिक जारची मागणी करतात. तसेच अनेक नागरिक शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. गल्लोगल्लीच्या या दुकानांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. पाण्याच्या जारवर आपल्या कंपनीचे लेबल लावून पाणी विक्री केली जाते.>गल्लीबोळात अन् घरातच थाटले व्यवसायकोणताही व्यवसाय सुरू करण्याकरिता महापालिका प्रशासन व ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विक्री करणाºया व्यावसायिकांना कुठलीही नियमावली नसल्याने पाणी विक्री करणाºयाचे फावले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता घरीच एक खोली किंवा शेड टाकून पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.गुणवत्ता तपासणीची नाही यंत्रणाकडक उन्हाळा सुरू झाल्यावर नागरिकांकडून थंड पाण्याची मागणी वाढते. या पाण्याची चार पाच दिवसांनी आपोआप चव बदलत असल्याने या पाण्याची गुणवत्ता लक्षात येते. पाण्याच्या गुणवत्ते संदर्भात जारवर कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी ग्राहकांवरच आहे. अन्यथा हे हवेसे वाटणारे थंड पाणी ग्राहकांच्या आरोग्याला बांधा निर्माण करू शकते.