शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

विसर्जन मिरवणूक २०१९ : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी ; उत्साह आणि जल्लोषपूर्ण भक्तिरंगाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:46 IST

पाऊस उघडल्यानंतर चिंचवड मधील मिरवणुकीत रंग भरू लागला आहे...

चिंचवड:  पारंपारिक वाद्यांचा दणदणाट , ढोल-ताशांचा गजर , फुलांसह भंडारा व गुलालाची उधळण, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर.... असा जयघोष यांसह सुरु असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पिंपरी येथील विसर्जन मिरवणुकीत उत्साह संचारला. त्यामुळे परंतु पाऊस उघडल्यावर पुन्हा गणेश मंडळे , कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये उत्साह संचारला. 

 * फ्रान्सवरून विल्यम्सन चिंचवड येथे आले असता गणपती चे आकर्षण त्यांना चिंचवड घाटावर घेऊन आले. तेथे त्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणपतीचे विसर्जन केले.

( क्षणचित्रे- अतुल मारवाडी आणि सहकारी ) 

दुपारी बाराच्या सुमारास येथील मिरवणूक सुरू झाली. रात्री आठपर्यंत ३७ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या स्वागतासाठी शगुन चौकात स्वागतकक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करून स्वागत केले.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवडमध्ये असते. दुपारी एक वाजल्यापासून चिंचवडमधील विसर्जन  सुरू झाली आहे चिंचवड गावातील चापेकर चौकामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारलेला आहे. दुपारी एकच्या दरम्यान पहिले गणेश मंडळ चौकात आले.  त्यानंतर चापेकर चौकातून वाल्हेकरवाडी रस्त्याने थेरगाव नदीघाटावर विसर्जन करण्यात आले.

ढोल-ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादाने उत्साह द्विगुणित झाला. पिंपरी फळ बाजारातील शिवराजे प्रतिष्ठानचा गणपती पावणे आठच्या सुमारास शगुन चौकात दाखल झाला. त्यानी सादर केलेला साई दरबार हा देखावा लक्षवेधक ठरला. शिवराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोमी संधू यांचे महापौर राहुल जाधव यांनी सत्कार करून स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. काही मंडळांनी आतषबाजी केली. काही जणांनी फुगड्यांचा फेर धरत रंगत आणली.

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड गावातील पवना नदी घाटावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे.  या ठिकाणी महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचे पथक आरोग्य वैद्यकीय विभागाचे पथक तैनात केले आहे दुपारी 1ते साडेपाच या वेळेत फक्त एकच मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहे. 

ढोल-ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत पारंपारिक वाद्यांचा दणदणाट करत चिंचवड मधील चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते .दुपारी 1 ते 3 या वेळेत फारशी मंडळे आली नाहीत.

 

पाऊस उघडल्यानंतर चिंचवड मधील मिरवणुकीत रंग भरू लागला आहे. चिंचवड स्टेशन, तानाजीनागर, भोईरनगर मार्ग मंडळे चिंचवड गावातील चापेकर चौकात येऊन पुढे विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होत होती. चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारला होता. व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक अश्विनी चिंचवडे , मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. पावणेआठपर्यंत मिरवणुकीत केवळ दोन मंडळे सहभागी झाली आहे. चिंचवड गावीतील मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्साह वाढू लागला आहे. गणेशभक्ताची गर्दी चौकात होऊ लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Visarjanगणेश विसर्जन