शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

विसर्जन सोहळा उत्साहात : पिंपरीत घुमला पारंपरिक वाद्यांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:45 IST

ढोल-ताशांचा निनाद करीत पारंपरिक पोषाखातील तरुण-तरुणींची ढोल, लेझीम पथके शिस्तबद्ध पद्धतीने एकापाठोपाठ एक विसर्जन मिरवणूक घेऊन येत होते.

पिंपरी : ढोल-ताशांचा निनाद करीत पारंपरिक पोषाखातील तरुण-तरुणींची ढोल, लेझीम पथके शिस्तबद्ध पद्धतीने एकापाठोपाठ एक विसर्जन मिरवणूक घेऊन येत होते. पिंपरीतील कराची चौकात येऊन पुढे रिव्हर रस्त्याने पिंपरीतील विसर्जन घाटावर या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होत होत्या. दुपारी दोनपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री बारापर्यंत पिंपरीतील घाटावर विसर्जन सुरू होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पिंपरीतील विसर्जन सोहळ्याची सांगता तब्बल दहा तासांनी झाली.हॅलोजनचा डोळे दिपविणारा लख्ख प्रकाश, कर्णकर्कश आवाज असलेल्या साउंड बॉक्सच्या भिंती, डीजेच्या तालावर ठेका धरणारे कार्यकर्ते हे गणेश विसर्जन मिरवणुकीतील दर वर्षी दिसून येणारे चित्र यंदा मात्र पिंपरीत चौकात पाहवयास मिळाले नाही. उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात डीजे वापरावर बंदी असल्याचा आदेश दिल्यामुळे विसर्जन मिरवुणकीत बदल दिसून आला. बहुतांश गणेश मंडळांनी ढोल, ताशा पथकांचा विसर्जन मिरवणुकीसाठी वापर केला. विशेषत: महिलांची ढोलपथके मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. चिंचवडगाव येथील पृथ्वी ढोल-ताशापथक,कासारवाडीतील मातृभूमी ढोल-ताशा पथक, चºहोली, जाधववाडी, नवलाख उंबरे आणि मावळातील ढोल-ताशापथकांनी पिंपरीतील विसर्जन मिरवणुकीला रंगत आणली. खराळवाडीतील काही मंडळांनी दुपारी दोनपर्यंत विसर्जन मिरवणूक काढून गणपती बाप्पाला निरोप दिला. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत तुरळक संख्येने मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी येत होत्या. सायंकाळी सहानंतर पिंपरीतील नामांकित मंडळे, मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या मिरवणुका आल्याने शगुन चौकापासून ते कराची चौकापर्यंत गर्दी वाढली. साई चौकातून येणाºया मिरवणुकाही कराची चौकात येऊन पुढे रिव्हर रस्त्याने विसर्जन घाटावर जात होत्या. गोकुळ हॉटेलपासून इंदिरा गांधी उड्डाणपुलामार्गे पिंपरीकडे जाण्याचा मार्ग इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. केवळ विसर्जन मिरवणुकांसाठी हा मार्ग खुला ठेवण्यात आला होता.दुपारी चार ते सहा या कालावधीत कोहिनूर, प्रेमप्रकाश, दारका, भैरवनाथ,न्यू चैतन्य, संग्राम, जय भारत, जेसी ग्रुप, साईनाथ मित्र मंडळ, मुशकराज मंडळ, नवजवान मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ आदी मंडळांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला. आकर्षक फुलांची सजावट केलेले रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल गोकुळजवळील नवचैतन्य गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शगुन चौकात आली. पारंपरिक ढोल-ताशा पथकाच्या गजरात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या मंडळाची मिरवणूक कराची चौकात आली. दोन चिमुकल्यांनी ताशाचा कडकडाट करून उपस्थितांना थक्क केले. त्यानंतर भाटनगरचा राजा, नवसाचा गणपती, शिवराजे प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणुका चौकात दाखल झाल्या. भागवत तरुण मंडळाने, तसेच शिवशाही प्रतिष्ठानाच्या वतीने आकर्षक रोषणाई केली होती. हे देखावे लक्षवेधी ठरले. मातोश्री मंडळाचा फुलांची आरास केलेला रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. डी वॉर्ड मंडळाने रामभक्त हनुमान असा देखावा सादर केला होता. हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. देखाव्यासमोर कासारवाडीतील ढोल, ताशापथक होते. महापौर राहुल जाधव, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.४ पिंपरी : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या गणेश मंडळाचे स्वागत महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश विसर्जनासाठी चिंचवड गाव येथील चापेकर चौकात आणि पिंपरी येथील कराची चौकात महापालिकेच्या वतीने मदत कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे तसेच ढोल, लेझीम पथकांच्या प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी चापेकर चौक, चिंचवड गाव येथे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्ष करुणा चिंचवडे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नामदेव ढाके, शीतल शिंदे, नगरसदस्या अपर्णा डोके, आश्विनी चिंचवडे, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी आदींनी मंडळांचे स्वागत केले. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, ब प्रभागाचे पंढरीनाथ गुंडाळ इत्यादी अधिकारी उपस्थित होते.विविध संस्थांचा सहभाग४कराची चौक, पिंपरी येथे सुमारे ५६ गणेश मंडळांचे तर चापेकर चौक, चिंचवड येथे सुमारे ५७ गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. पिंपरी व चिंचवड येथील घाटावर विसर्जन हौद, निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कुंड, अग्निशमन वाहन, फिरत्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. घाटावर अग्निशमन दलाचे जवान तसेच जीवरक्षक, सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी तसेच भारतीय जैन संघटना संत तुकारामनगर, नव महाराष्ट्र महाविद्यालय पिंपरी, डी़ वाय़ पाटील कॉलेज, लायन्स क्लब पिंपरी या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. घाटांच्या परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. या व अशा प्रकारच्या इतर सर्व सुविधा महापालिकेमार्फत देण्यात आल्या. पुष्पांचा वर्षाव करून मोठ्या हर्षोउल्हासात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषाणा देत गणेश विसर्जन करण्यात आले.चिंचवड परिसरामध्ये डीजेविरहित मिरवणूक चिंचवड : ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषाने चिंचवड परिसर गर्दीने फुलला होता. चिंचवडमधील पवना नदीघाटावर सकाळपासून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवडकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक पाहण्यासाठी चिंचवडमधील चापेकर चौकात भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.चिंचवडमधील थेरगाव घाट, मोरया समाधी मंदिर घाट व काकडे पार्क येथील घाटावर सकाळी सातपासून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते. घाट परिसरात निर्माल्यदान व मूर्तिदान करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते सज्ज होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात होता.पोलीस मित्र संघटना व पोलीस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीला उभे होते.दुपारी दोनला सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका चापेकर चौकात येण्यास सुरुवात झाली. चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळ, चिंचवड स्टेशन येथील गणेश मित्र मंडळाचे गणपती चौकात आले. यानंतर ओंकार मित्र मंडळ, सूर्योदय मित्र मंडळ व सायंकाळी पाचला अजिंक्य मित्र मंडळ विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी सहापासून अनेकांनी विसर्जन मार्गावर गर्दी केली होती. मात्र रात्री साडेआठपर्यंत एकाही मंडळाचे आगमन झाले नाही.विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. मात्र या व्यासपीठावर अनेक राजकीय व्यक्तींची उपस्थिती होती. महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यासह नगरसेवक राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,शीतल शिंदे,मोरेश्वर शेडगे,नामदेव ढाके,अपर्णा डोके,अश्विनी चिंचवडे,करुणा चिंचवडे,सहायक आयुक्त दिलीप गावडे, प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.रात्री ८:४५ला फुलांची उधळण करत दत्त मित्र मंडळाचे आगमन झाले.रात्री ९ वाजता दळवीनगरातील श्री समर्थ मित्र मंडळाचे आगमन झाले.पारंपारिक वाद्याची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. फुलांची आरास व विद्युत रोषणाई हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.याच वेळी गांधी पेठेतून भगतसिंग मित्र मंडळाचे आगमन झाले. पालखीत विराजमान असणाºया गणरायाला निरोप देण्यासाठी या मंडळात महिलांचा मोठा सहभाग होता. या मिरवणुकीचे फोटो घेण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होती. फुलांनी सजविलेली पालखी लक्षवेधी ठरली. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड