शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गायरानावर अतिक्रमण करून बांधले इमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:26 IST

मावळ तालुका : प्रशासनाला मिळेना शासकीय इमारतीसाठी जागा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात १२०० हेक्टर गायरान क्षेत्र आहे. त्याचा ताबा अनेक ग्रामपंचायतींकडे आहे. त्यातील काही गायरान जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या मालकीची जागा असूनदेखील विविध शासकीय कार्यालये, रुग्णालये बांधण्यासाठी जागेअभावी भटकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेक भागात काही पदाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी मोठमोठे बंगले उभारले आहेत.

तालुक्यातील तळेगाव दाभाडे, गोडुंब्रे, वराळे,आंबी शासनाने २०११ नंतर गायरान जमिनी खासगी अथवा वैयक्तिक प्रकल्पासाठी देणे बंद केले आहे. फक्त शासकीय अथवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गायरान जमिनींचा वापर करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.ज्या गावात गायरान आहे त्याची देखभाल ग्रामपंचायतीकडे असते. डोंगरगाव,कुसगाव बु. आदी भागासह काही ठिकाणी गायरानावर अतिक्रमण झाले आहे. तालुक्यात एक आरोग्य केंद्र व सात उपकेंद्र मंजूर आहेत.मात्र त्यासाठी केवळ जागा मिळत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून आरोग्य केंद्र होऊ शकली नाहीत. तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींपैकी उर्से, चिखलसे, पालेनामा, दिवड व पांगळोली या ठिकाणी ७० हेक्टरपेक्षा जास्त गायरान क्षेत्र असून, ५० ग्रामपंचायतीमध्ये १२ ते १५ हेक्टर क्षेत्र आहे. मावळ तालुक्यात कारवाई केल्यास अनेक जणांची पदे धोक्यात येण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. गायरानावर अतिक्रमण करणाºयांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.संबंधितांवर कारवाई करणार४गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाºयांवर कारवाई केली जाईल. त्यात ते पदाधिकारी असतील, तर त्यांची पदे कायद्याने धोक्यात येऊ शकतात. गायरानातील जागा खासगी व वैयक्तिक वापरासाठी बंद केलेले आहे. सार्वजनिक वापरासाठी जागा मिळू शकते.त्यासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे, असे तहसीलदार रणजीत देसाई यांनी सांगितले.४गायरान क्षेत्र असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे—-चिखलसे : ८१-३२ हेक्टर,उर्से : १८२-२० हेक्टर,पांगळोली : ११७-६१,पालेनामा : ९१ -४५, वडेश्वर : १७-६३,दिवड ७३-६२ सावळे २५-१७ ,धामणे १८-३,गोडुंब्रे १९-७१,वराळे 20 हेक्टर,सुदुंब्रे 20-48,नाणोली तर्फे चाकण 47-26,सुदवडी 22-22,भाजगाव 43-34,आढले बुद्रुक 23-5. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड