शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:31 IST

झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा. याकरिता महापालिकेने अनामत रक्कम, दंड आणि पाणीपट्टी रक्कम कमी करण्याचे धोरण आखले आहे.

ठळक मुद्देमीटर पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी दर निश्चित २ हजार ९०० रुपये शुल्क अवैध नळजोड नियमित करण्यासाठी आकारण्यात येणार

पिंपरी : झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा. याकरिता महापालिकेने अनामत रक्कम, दंड आणि पाणीपट्टी रक्कम कमी करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार, अवैध नळजोड नियमित करण्यासाठी अनामत रकमेपोटी दीड हजार रुपये, दंडापोटी ५०० रुपये आणि प्रति वर्षे १८० रुपये याप्रमाणे पाच वर्षाचे नऊशे रुपये असे एकुण २ हजार ९०० रुपये आकारण्यात येणार आहेत. हे धोरण घोषित, अघोषित आणि अवैध झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोडांबाबत लागू होणार आहे. झोपडपट्यालगत वाढलेल्या झोपड्यांमधील नळजोड नियमित करण्यासाठीही लागू राहणार आहे. अवैध नळजोड नियमित करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत राहणार आहे.     स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. महापालिकेने सर्वसामान्य ग्राहक, झोपडपट्टी धारकांसह हॉटेल्स, दुकाने, खासगी शैक्षणिक संस्था, सरकारी-निमसरकारी कार्यालये, रेल्वेस्टेशन, रूग्णालये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धमार्दाय मंडळे, क्रीडासंकुल, महापालिका मालमत्ता यांच्यासाठी पाणीपट्टीचे वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच महापालिकेने पाणीपट्टीचे नवीन दर निश्चित केले आहेत. त्यामध्ये पाणीपट्टी बिल वेळेत न भरणाऱ्यांना वार्षिक १० टक्के दंड, पाणीपट्टीत दरवर्षी ५ टक्के वाढ करण्याचे धोरण ठरविले. झोपडपट्टी धारकांसाठी हे धोरण प्रस्तावित करताना मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी दर निश्चित केले आहेत. तसेच अवैध नळजोड नियमित करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. झोपडीधारकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करताना अनामत रक्कम, दंड आणि मागील वषार्ची पाणीपट्टी रक्कम कमी करण्यात आली आहे.     १५ मिलीमीटर व्यासाच्या नळजोडासाठी स्वत: मालक अथवा भाडेकरू असल्यास दीड हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. दंडापोटी ५०० रुपये आणि पाणीपट्टी रक्कम प्रतिवर्ष १८० रुपये याप्रमाणे पाच वर्षांचे ९०० रुपये असे एकुण २ हजार ९०० रुपये शुल्क अवैध नळजोड नियमित करण्यासाठी आकारण्यात येणार आहे. हे धोरण घोषीत, अघोषीत आणि अवैध झोपडपट्ट्यांलगत वाढलेल्या झोपड्यांमधील नळजोड नियमित करण्यासाठीही लागू राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी