शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर बेकायदा वेश्याव्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:23 IST

पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष : अवैध धंदे व गुन्हेगारीत होतेय वाढ..

ठळक मुद्देमटका, जुगार, बेकायदा मद्यविक्री व हुक्का पार्लरमुळे येथील गुन्हेगारीत सातत्याने वाढ तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू यांचा दुवा म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख

पिंपरी : संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर हे अवैध धंद्याचे आगार बनले आहे. मटका, जुगार, बेकायदा मद्यविक्री व हुक्का पार्लरमुळे येथील गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये आता बेकायदा वेश्याव्यवसायाची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१ हॉटेल व लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू यांचा दुवा म्हणून पिंपरी-चिंचवड शहर ओळखले जाते. महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने उद्योगनगरी पावन झाली आहे. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक व धार्मिक संस्कृतीला मात्र अवैध धंद्यांचे ग्रहण लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही सोयीस्कर राजकारणामुळे व आर्थिक उलाढालीमुळे राजकीय नेते गप्प आहेत. त्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने सर्वकाही आलबेल आहे. तीर्थक्षेत्र आळंदी रस्त्यावरील देहूफाटा, चºहोली फाटा व मरकळ रस्ता या ठिकाणी दिवसाढवळ््या देहविक्री करणाºया महिला येथून मार्गस्थ होणाºया भाविकांना खुणावत उभ्या राहतात. या व्यवसायामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला असलेले हॉटेल व लॉजधारक सामील आहेत. आळंदी रस्ता, तळेगाव ते वडगाव मावळ महामार्ग, देहू व चºहोली फाटा, भोसरी, पिंपरी व निगडी येथील सुमारे ४१ हॉटेल व लॉजवर हा वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू आहे. हे माहिती असूनही कारवाईऐवजी पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे........देहविक्रय करणाºया महिलांचा महामार्गांवर वाढला वावरशहरातून पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, तसेच मुंबई-बेंगळुरू महामार्ग जातात. देहविक्रय करणाºया महिला या महामार्गांवर दररोज सायंकाळनंतर ठिकठिकाणी घोळक्याने दिसून येतात. वाहनचालकांना हात दाखवून तसेच खुणावून थांबवितात. वाहनचालक तसेच लहान मुले व इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच चोरीच्या घटनांसह वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. .........पिंपळे सौदागरचे नागरिक झाले त्रस्त पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट परिसर म्हणून पिंपळे सौदागरची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या भागात क्लबच्या नावाखाली जुगार, मटका, तीन पत्ती, सोरट यांसह अनेक प्रकारचे  बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांना व महिलांना या प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या लगतचा परिसर म्हणून पिंपळे सौंदागरमध्ये मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू नागरिक राहतात. क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार व मटक्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कष्टकरी, रिक्षाचालकापासून ते गुंठामंत्र्यापर्यंत अनेकांची पावले क्लबकडे वळली आहेत. शाळा-कॉलेजला चाललो असे सांगून तरुणही क्लबमध्ये जात आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSex Racketसेक्स रॅकेटhotelहॉटेलPoliceपोलिस