शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटवर शोधत असाल, तर सावधान! तुमची फसवणूक होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 12:01 IST

तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील...

ठळक मुद्दे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे फसवणूक होत असल्याची बाब उघड

योगेश्वर माडगूळकर-पिंपरी : ऑनलाइन पेमेंट फेल गेले तर संबधित अ‍ॅपच्या ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटच्या माध्यमातून शोधत असाल, तर सावधान. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील. असाच प्रकार निगडी-प्राधिकरण येथील उच्चशिक्षित महिलेच्या बाबतीत घडला आहे. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे फसवणूक होत असल्याची बाब उघड झाली आहे. 

फसणूक झालेल्या महिलेचे ४३८ रुपयांचे ट्रांझेक्शन एका अ‍ॅपद्वारे फेल गेले होते. त्यांनी इंटरनेटद्वारे ग्राहक सेवा केंद्राचा शोध घेतला. ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक मिळाला. ट्रांझेक्शन फेल गेल्याचे संबंधित महिलेने ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीस सांगितले. संबंधिताने महिलेस पैसे दोन तास परत करतो; पण अकाऊंट नंबर डिटेल सांगण्यासाठी एक ट्रांझेक्शन फेल करावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याने संबंधित खात्यावरील शिल्लक रक्कमही विचारली. महिलेने संबंधित अ‍ॅप उघडला. त्यावर ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीने सांगितलेला कोड टाकला. तो चार अंकी होता. त्याखाली त्यांने रिफंड असे लिहण्यास सांगितले. त्यानंतर कोड टाकण्यास सांगितले. टाकलेला कोड म्हणजे अकाऊंटमधील तेवढे पैसे गायब झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आले. खात्यावरील चार हजार गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने फोन चालू ठेवला. संबधित अकाऊंटवरील पैसे दुसऱ्या खात्यावर वळविले. हा नंबर बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्राहक प्रतिनिधीने एटीएम कार्डचे डिटेल मागितले. ते डिटेलही त्याला दिले. त्यानंतर ओटीपी विचारून दुसऱ्या खात्यातील रक्कम पळविण्याचा प्रयत्न करत होता. पण संबधित महिलेने त्याला ओटीपी सांगितला नाही. त्यामुळे संबंधिताला दुसऱ्यांदा फसवणूक करता आला नाही.  

लोकप्रतिनिधी आणि बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी झालेला संवाद संबधित बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी बनावट ग्राहक सेवा केंदातून ‘लोकमत’ प्रतिनिधीला मोबाईल नंबर विचारला. तसेच अकाऊंटचा बॅलन्स विचारला. प्रतिनिधीने फोन कट केला. त्यानंतर ग्राहक सेवा केंद्रातून पुन्हा फोन आला. पण लोकमत प्रतिनिधीने माझे पैसे परत मिळाले आहेत, असे सांगतिले. त्यानंतर त्याने फोन कट केला.

....................................

काय काळजी घ्यावी१) नेटवरून कोणत्याही अ‍ॅपचा ग्राहक क्रमांक शोधू नये.२) अ‍ॅपचे प्रतिनिधी कधीही बँकेचा अंकाऊट नंबर विचारत नाहीत. त्यामुळे हा नंबर कोणालाही सांगू नये.३) खात्यातील शिल्लक रक्कम विचारत नाहीत. तेही कोणालाही सांगू नये.४) प्रत्येक अ‍ॅपने तक्रार देण्यासाठी मदत केंद्राची सोय केली आहे. त्यावर संपर्क साधावा.५) एटीएम कार्डची माहिती कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्याची माहिती देऊ नये.६) ओटीपी कोणालाही शेअर करू नये.७) अधिकृत प्रतिनिधी कधीही सेल्फी मागत नाहीत. त्यामुळे सेल्फी देऊ नये८) सेल्फी दिल्यास सोशल मीडियावर बदनामी होण्याची शक्यता आहे.

........................

निर्ढावलेले गुन्हेगारहे प्रकार झारखंड परिसरातील जमताडा परिसरातून सुरू आहेत. त्या गुन्हेगारांना आपण महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक करत आहोत, हे माहीत आहे. याठिकाणी पोलीस सहजासहजी पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे हे प्रकार सुरू आहेत. तक्रार करूनही पैसे परत मिळणार नाहीत. फुकट मनस्ताप नको, म्हणून अनेक नागरिक तक्रारही करत नाहीत. अनेक वेळा सेल्फी मागवून घेतला जातो. त्याद्वारे सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव रचले जाते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीInternetइंटरनेट