शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘कारवाईला आडवा आल्यास अजितदादावरही ३५३ टाका’, हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आक्रमक भूमिका

By नारायण बडगुजर | Updated: July 26, 2025 23:27 IST

Ajit Pawar News: रस्ता रुंदीकरणात आडवा आलेल्यांवर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजितदादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.

- नारायण बडगुजर

पिंपरी - रस्ता रुंदीकरणात आडवा आलेल्यांवर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजितदादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.

हिंजवडी माण आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी शनिवारी (दि. २६ जुलै) पाहणी केली. त्यावेळी स्थानिकांनी व लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली. आमची बांधकामे रस्ता रुंदीकरणात जात आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, आयटी पार्क परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे. रुंदीकरणात बाधा ठरणारी बांधकामे व इतर कोणाच्याही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करू नका. या कारवाईत कोणी आडवा आला तर त्याच्यावर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश मी यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजित दादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे ते म्हणाले.

तुम्ही पैसे कमावता बदनामी आमची होतेआयटी पार्कमधील नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई होत आहे. संबंधित बांधकाम करणारा बांधकाम व्यावसायिक अजित पवार यांच्याकडे विनंती करण्यासाठी आला. दादा आमची चूक झाली. आमचे बांधकाम पाडू नका, असे व्यावसायिक म्हणाला. त्यावर अजित पवार म्हणाले, तुम्ही पैसे कमावता मात्र, बदनामी राज्य शासनाची होत आहे. अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते? हे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.

कारवाईचा दिखावा?अजित पवार यांनी १३ जुलै रोजी पाहणी करून हिंजवडी एमआयडीसी हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर एमआयडीसीकडून काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. दरम्यान, पवार पुन्हा पाहणी करणार असल्याचे माहित झाल्यानंतर एमआयडीसीने शुक्रवारी पुन्हा कारवाई सुरू केली. ही कारवाई केवळ अजित पवारांना दाखवण्यासाठी केली जात आहे. कारवाई सुरू असल्याचे दिसावे यासाठी जेसीबी मशीन आणून ठेवले आहेत, असा आरोप काही नागरिकांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड