शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 00:35 IST

आयटीयन्स अभियंता : शेअरिंग स्माईल ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना मदत

वाकड : आयटी पार्क हिंजवडीसह, खराडी, मगरपट्टा, शिवाजीनगर, तळवडे व तळेगाव येथे आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या आयटीयन्स तरुणांनी एकत्र येत ‘शेअरिंग स्माईल’ या ग्रुपची स्थापना केली आहे. त्याद्वारे स्वत:च्या खिशाला कात्री लावून आणि सुट्टीचा वेळ सत्कारणी लावत मागील नऊ वर्षांपासून दुर्गम भागातील आदिवासी, गरजू रहिवासी आणि गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत.

यंदाच्या वर्षी ‘सेल्फ एम्लायॉमेंट’ या उपक्रमा अंतर्गत गाई, शेळी, कोंबड्या, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, विद्यार्थ्यांची शाळेची फी भरणे, फराळवाटप अशा विविध उपक्रमांद्वारे लोकांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली. लॅपटॉप मॅन अशी ओळख असणाºया त्या आयटीयन्स तरुणांनी समाजाला एक आदर्श घालून देत आॅनलाइनपेक्षाही आॅफलाइन जगतात मोलाची कामगिरी करीत असल्याचे दाखवून दिले आहे. यंदा या शेअरिंग स्माईल ग्रुपने तब्बल ८२ कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. कोटमवाडी (पवनानगर मावळ) गावातील दोन कुटुंबांना सात देशी गायींचे व एका खिलार गाईचे वाटप, आठ कुटुंबांना प्रत्येकी दोन-दोन शेळ्या वाटप, चार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता कापडी पिशव्या शिवण्याचा रोजगार देण्यात आला. तर मळवंडी गावात एका कुटुंबाला अंडी व्यवसायाकरिता २५ कोंबड्याचे वाटप, शिवणे गावातील १२ वीत शिकणाºया विद्यार्थिनीला तीन किमीचा टप्पा पायी पार करून ये-जा करावी लागत असल्याने तीला सायकल भेट व तिच्या कुटुंबीयांना १५ कोंबड्या वाटप, एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीची संपूर्ण शैक्षणिक वर्षाची महाविद्यालयीन फी भरली, शिळीम या गावात चार कुटुंबांना प्रत्येकी दोन-दोन शेळीवाटप करण्यात आले. जांभुळणे गावात २० कुटुंबांना अन्नधान्य आणि फराळ त्याबरोबर गावातील प्रत्येक महिलेला प्रत्येकी तीन साड्या तर लहान मुलांचे कपडे व ज्येष्ठ नागरिकांना उबदार कपडे भेट देण्यात आले.पैशांची मदत करणारे काही जण परदेशात तर काही जण बंगळूर, हैद्राबाद या परराज्यातदेखील बदली झाल्याने नोकरी करतात़ मात्र लोकांच्या प्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्यांची मदत कधीही थांबली नसल्याचे सूरज दिघे सांगतात. यंदा अडीच लाख रुपये जमा करून त्याचा गरजू लोकांसाठी वापर करण्यात आला आहे. केवळ दिवाळीपूरता हा उपक्रम सिमित न ठेवता कामाची व्याप्ती वाढवून दर महिन्याला विविध गोष्टी करण्याचा संकल्प यंदाच्या वर्षांपासून करण्यात आला आहे. केवळ मदत करून काम संपले असेही नाही तर संबंधित व्यक्तीचा वेळोवेळी आढावादेखील घेण्यात येतो़ त्याद्वारे या मदतीचा वापर ती व्यक्ती कशी करते स्वत:ची प्रगती साधते की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवून तो स्वावलंबी होत स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करणार आहे़ त्यामुळे शेअरिंग स्माईलच्या उपक्रमात अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रवींद्र वाकडकर यांनी केले आहे.या ग्रुपमधील बहुतेक सर्व सभासद उच्चशिक्षित आयटी अभियंते आहेत़ एमबीए, डॉक्टर, आर्टिस्ट, सी.ए़ असे वेगळ्या फिल्डमधील तरुण सहभागी झाले आहेत. तर तब्बल ७० टक्के तरुण-तरुणी आयटी पार्क हिंजवडीतील आहेत.दिवाळी : मिठाईवाटपशेअरिंग स्माईलचे सदस्य सूरज दिघे, विनायक मावकर, अमोल अकोलकर, अजय शिंदे, रोहित भेगडे, पुष्पराज कुंभारकर म्हणाले अंध, मतिमंद अशा दिव्यांग मुलांच्या चेहºयावरील आनंद महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या आनंदात आम्हाला समाधान मिळत असल्याने यंदाच्या वर्षी इंदोरी येथील अंध मुलांच्या आश्रमात आणि तळेगाव येथील जीवनधारा मतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळीनिमित्त मिठाईवाटप करण्यात आली. अमोल अकोलकर म्हणाले, आपली मुले इंग्रजी शाळेत जाऊन मस्त पोयम म्हणतात़ मात्र त्यांनी पोयम बरोबरने तुकोबारायांची व माऊलींच्या ओव्यांची माहती ठेवून आपली मराठी संस्कृती व परंपरा जपावी. मोबाइलच्या अती वापर टाळून संवाद हरवू देऊ नये.४पुणे-लोणावळा लोकलने नोकरीला जाता येता दैनंदिन प्रवासादरम्यान या तरुणांच्या विचारांना चालना मिळाली़ समाजासाठी काही तरी करायला हवे या एकाच नि:स्वार्थी हेतूने सुमारे शंभरहून अधिक आयटीयन्स तरुण-तरुणी एकत्र आल़े त्यातून पहिला उपक्रम सूचला तो म्हणजे फटाक्यांची आतषबाजी न करता विधायक पद्धतीने वंचित लोकांपर्यंत पोहोचत त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा. वडगाव (मावळ) तालुक्यातील दुर्गम पवनानगर परिसरातील कोटमवाडी, जांभूळणे, शिळीम, कोळेचाफेसर या गावांत प्रत्यक्षरित्या जाऊन या तरुणांनी नागरिकांच्या व्यथा जाणून घेत मदत केली आहे. या ग्रुपमधील बहुतेक सर्व सभासद उच्चशिक्षित आयटी अभियंते आहेत़ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlaptopलॅपटॉपDiwaliदिवाळी