शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छंद कसे जगायचे ते शिकवेल - उपेंद्र लिमये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:36 IST

शिक्षण जगवेल आणि छंद कसे जगायचे ते शिकवेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध्र अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले. चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृहामध्ये फेअर फेस्टोचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी - शिक्षण जगवेल आणि छंद कसे जगायचे ते शिकवेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध्र अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले.चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृहामध्ये फेअर फेस्टोचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाºया युवक-युवतींच्या प्रश्नांना उत्तर देताना लिमये बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, उद्योजक शैलेश शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, ब्रिगेडीअर अजय लाल, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, डॉ. क्षितिजा गांधी, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. सुवर्णा गोगटे आदी उपस्थित होते. लिमये यांच्या हस्ते कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्यांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालक व विद्यार्थ्यांची मने जिंकली.प्राचार्य डॉ. कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. ‘‘मी पुणे येथे प्राचार्य असताना उपेंद्र लिमये हा माझा विद्यार्थी होता. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला-गुणांची जाणीव शिक्षकाला असेल, तर उपेंद्रसारखे नवीन कलाकार भावी काळातही घडतील, असा विश्वास वाटतो,’’ असे ते म्हणाले.अहवाल वाचन प्रा. क्षितिजा गांधी यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी किरण गोरे यांनी आभार मानले.सामाजिक जाणीव, देशप्रेम व्हॉट्सअ‍ॅपवरच!अभिनय क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिकांसाठी आर्थिक देवाण-घेवाण होते का, वशिलेबाजी चालते का, अभिनेता होण्यासाठी काय करायचे, आपणास आवडलेली भूमिका कोणती आदी प्रश्नांची लिमये यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘शिक्षण पुण्यात झाले. मी बंडखोर विद्यार्थी होतो. वृत्तीही अभ्यासाची नव्हती. २५ वर्षांपूर्वी मॉर्निंग शोला जात होतो. सांस्कृतिक कार्यक्रमांत रस होता. त्यातूनच मी घडलो. या क्षेत्रात पुढे यायचे असेल, तर ज्यात आनंद मिळेल ते काम स्वीकारा. तारुण्यातली वर्षे चुकीच्या ठिकाणी वाया घालवू नका. तसे केले तर ध्येयापासून दूर जाल. दंगामस्ती तर कराच; पण शिक्षण घेत असतानाच पुढील आयुष्याचाही विचार करा. युवा पिढी मशिन होत चालली की काय, असे वाटते. सामाजिक जाणीव, देशावरील प्रेम व्हॉट्स अ‍ॅपवरच दाखवितो. कृती मात्र हव्या त्या प्रमाणात दिसत नाही.

टॅग्स :entertainmentकरमणूकPuneपुणे