शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गैरकारभार करणा-यांना घरचा रस्ता, पालकमंत्र्यांचा इशारा, महापालिका पदाधिका-यांचे उपटले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:02 IST

शहरात सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणीची व महापालिका पदाधिका-यांची आढावा बैठक आज झाली. यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनमानीपणे कारभार करणा-या पदाधिका-यांचे कान उपटले.

पिंपरी : शहरात सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणीची व महापालिका पदाधिका-यांची आढावा बैठक आज झाली. यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनमानीपणे कारभार करणा-या पदाधिका-यांचे कान उपटले.‘‘महापालिकेत दररोज काय होते, काय घडते, याची माहिती माझ्याकडे असते. दररोज वृत्तपत्र वाचतो. त्यामुळे महापालिकेत माझ्यामुळे सत्ता आल्याच्या भ्रमात राहू नका. भाजपाच्या नावाने गैरकारभार करू नये, केल्यास गय केली जाणार नाही, घरचा रस्ता दाखविला जाईल,’’ असा सज्जड इशारा त्यांनी दिला.पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भाजपा शहर कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी पालकमंत्र्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.चार मंडलाधिकारी निलंबितबैठकीस चार मंडलाधिकारी अनुपस्थित होते. याबाबत पदाधिकाºयांना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माहिती विचारली असता, त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही. त्यामुळे चार मंडलाधिकाºयांना काढून टाका, असे निर्देश ज्येष्ठ पदाधिकाºयांनी दिले. बेशिस्तांची गय केली जाणार नाही, असेही सूचित करण्यात आले.भ्रमातून बाहेर या!पालकमंत्री बापट यांनी पदाधिकाºयांना कोल्हा व हत्तीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘‘कोल्ह्याची सावली मोठी झाली म्हणजे तो मोठा होत नाही. या गोष्टीचा मतितार्थ म्हणजे, भाजपा खूप मोठा पक्ष आहे. भाजपाची देशभरात सत्ता आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेत आपल्यामुळेच सत्ता आली, असे कोणी भ्रमात राहू नये, त्यातून बाहेर पडून कामे करा.’’

टॅग्स :Puneपुणे