शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 16:11 IST

आरोपीवर देहुरोड, चिंचवड, भोसरी, दौंड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट एक : भोसरी येथे केली कारवाई

पिंपरी : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अठक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. १८) ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ रुपेश सुरेश पाटील (वय २८, रा. भोसरी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. संतोष पाटील याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरून पायी चालत येऊन स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारासमोर येऊन थांबला. त्यावेळी त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्याजवळ जात असताना त्याला संशय आला. त्यामुळे तेथून तळ्याच्या दिशेने मोकळ्या मैदानाकडे पळून जाऊ लागला. त्यावेळी पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाटील याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    आरोपी संतोष पाटील याच्यावर देहुरोड, चिंचवड, भोसरी, दौंड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, बेकायदा पिस्तूल बाळगणे असे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे तसेच पोलीस कर्मचारी विजय मोरे, प्रवीण पाटील, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

खूनप्रकरणी आरोपी दोन वर्षे होता जेलमध्येआरोपी संतोष पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. २०१४ मध्ये रावेत येथील हॉटेल शिवनेरीसमोर  विनायक शिंदे (रा. रावेत) यांचा गोळ्या घालून खून झाला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी संतोष पाटील व त्याचे साथीदार प्रदीप पवार, कौशल विश्वकर्मा, तुषार जोगदंड, प्रदीप गाढवे, राहुल करंजकर यांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. याप्रकरणी आरोपी संतोष पाटील सुमारे दोन वर्षे जेलमध्ये होता. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक