शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: होमगार्डला पाच जणांकडून मारहाण; दोन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:07 IST

चिखलीतल्या घरकुल परिसरातील घटना; गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू

पिंपरी : मद्यपान केलेल्या काही जणांकडून दुकानाबाहेर बाचाबाची सुरू होती. होमगार्डने त्यांना हटकले. त्यामुळे पाच जणांनी होमगार्डला मारहाण केली. चिखली येथे घरकुल परिसरात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. चिखली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्युटी संपल्याने संबंधित होमगार्ड घराकडे निघाला होता. त्यावेळी घरकुल परिसरातील एका दुकानासमोर काहीजण थांबले होते. यातील मद्यपान केलेल्या काही जणांकडून बाचाबाची करण्यात येत होती. तो गोंधळ पाहून होमगार्ड तेथे थांबला. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्यांना होमगार्डने हटकले. त्याचा राग येऊन ते होमगार्डच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी होमगार्डने एका तरुणाला काठी मारून ढकलले. त्यानंतर तीन-चार जणांनी होमगार्डला मारहाण केली.

संबंधित होमगार्ड महापालिका सेवेत आहे. शहरात कोरोना योद्धा म्हणून होमगार्डदेखील कार्यरत आहेत. होमगार्ड व पोलिसांवर हल्ले होऊन मारहाणीचे काही प्रकार घडले आहेत. कोरोना योद्धांवर अशा पद्धतीने हल्ले होऊन मारहाण करण्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड