शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस

By विश्वास मोरे | Updated: July 25, 2024 12:17 IST

सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे.

पिंपरी: पिंपरी चिंचवड सह मावळ मुळशी परिसरामध्ये गेल्या २४ तासांमध्ये जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तर पवना नदीकाठच्या चिंचवड केशवनगर भागामध्ये नागरी वसाहतीमध्ये पाणी सोडले आहे. लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३२३ मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सलगपणे पिंपरी -चिंचवड आणि मावळ, मुळशी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील शासकीय खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. केशवनगर चिंचवड परिसरातील पोतदार स्कूलच्या परिसरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तसेच चिखली घरकुल परिसरामध्ये काही भागांमध्ये पाणी घुसले आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

कामगारांची झाली गैरसोय

संततधार पाऊस सुरू असल्याने सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या आणि शेवटच्या शिफ्ट वरून येणाऱ्या कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली. घरकुल बिल्डींग न.सी ३३ सोसायटी समोरील  परिसरातील गंभिर परिस्थिती. रस्त्याला मोठया जलाशयाचे स्वरुप तयार झाले आहे. 

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुळशी  धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी  ७० टकके क्षमतेने भरले असून आज दू. २:०० वा धरणाच्या सांडव्यावरून २५०० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात ,पाऊस चालू, वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवर धरणाचे अधिकारी बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.

२४  तासात झालेला पाऊस(मिलिमीटरमध्ये)

लवासा  :   453लोणावळा:    322.5निमगिरी:     232.5चिंचवड:    175.0तळेगाव दाभाडे :    167.5लवळे:     166.5वडगाव शेरी: 140.5पाषाण: 117.2शिवाजीनगर: 114.1दापोडी:     102.0खेड:     93.0हवेली :     82.0बारामती :    20.4 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसAjit Pawarअजित पवार