शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:41 IST

दुतर्फा जलपर्णी वाढत असल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव; प्रशासनाचे दुर्लक्ष

- चंद्रकांत लोळेकामशेत : इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असून, संबंधित परिसर दलदलयुक्त झाला आहे. रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पंपाजवळ शहरातील गटारांचे दूषित पाणी, बाजारपेठेतील सांडपाणी, रेल्वे वसाहतीचे व रेल्वे स्टेशन शौचालयाचे सांडपाणी एकत्रितरित्या नदीपात्रात जाऊन इंद्रायणी नदी दूषित होत आहे. दूषित पाण्याने व दलदलीने नदी पात्राच्या दुतर्फा जलपर्णी वाढत आहेत. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येणाऱ्या जलपर्णी, सांडपाणी, कचरा यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.मावळातील अनेक प्रमुख शहरे व गावांना इंद्रायणी नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असून, नदी परिसरातील शेतीच्या सिंचनासाठीही उपयोग होतो. पण गेल्या काही वर्षांपासून वाढत्या शहरीकरणामुळे इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. परिणामी या नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणाºया भागांमध्ये रोगराई पसरण्याची भीती अनेक सामाजिक संघटना व जागृत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.कामशेत शहरात पिण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर होत असून, मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे प्रदूषण होत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक ठिकाणी प्रदूषित केले जात असून, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. नाणे रोडच्या इंद्रायणी पुलाच्या परिसरात नदीपात्रात वाहने धुतली जातात. तसेच येथे अनेक जागी राडारोडा, मातीचे ढिग, अन्न पदार्थ व निर्माल्याचे ढिग मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळे नदीपात्र अरुंद होत चालले आहे. इंद्रायणी नदीच्या घाटांवर याच दूषित पाण्यात अनेक महिला कपडे धुवतात. नागरिक व लहान मुले आंघोळी करत असताना दिसतात. हे आरोग्यास हानिकारक ठरत आहे.शहरात पिण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर होत आहे. या नदीच्या दोन ठिकाणी शहराला पाणीपुरवठा करणारे पंप हाऊस आहेत. त्यातील कामशेत रेल्वे स्टेशनच्या सुरुवातीला असणाºया पंप हाऊसजवळच नदीवर छोटा घाट आहे. येथे नागरिक व महिला नेहमीच कपडे धुणे, अंघोळी साठी येत असतात. याच ठिकाणी काही अंतरावर मोठ्या प्रमाणात शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. या नदी परिसरात दलदल झाली असून, काळ्याभोर रंगाचे सांडपाणी नदीपात्रात मिसळले जात आहे. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक ठिकाणी प्रदूषित केले जात असून, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.दरवर्षी पावसाळा सुरू झाला की शहरातील सर्वच भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ग्रुप ग्रामपंचायत यांच्या पाणीपुरवठा विभागामार्फत स्थानिकांना होणारा पिण्याचा पाणीपुरवठ्यातून नळाद्वारे येणारे पाणी गडद हिरव्या रंगाचे असते. त्यावर तेलकट तवंग तसेच वेगळाच वास ही येत असल्याची सर्वच नागरिक तक्रार करीत आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदीpollutionप्रदूषण