शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात सर्वेक्षण करणाऱ्या 'आशा कर्मचाऱ्यांचे' आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:31 IST

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत.

ठळक मुद्देआरोग्य योध्यांना महापालिकेकडून विमा संरक्षण, मानधन, प्रोत्साहान भत्ता द्यावा,अशी मागणी

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. त्यांना कोणतीही सुरक्षेची साधने दिली नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आशा कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर, साबण व मास्क यांसारखे साहित्यही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा १२ मार्चला पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. कोरोनाविषयी सर्वेक्षण करणे आशा कर्मचाऱ्यांना तसेच आरोग्य योध्यांना महापालिकेकडून विमा संरक्षण, मानधन, प्रोत्साहान भत्ता द्यावा,अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून नियुक्ती होणाऱ्या आशा कर्मचारी यांना देखील सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण अथवा एकत्रित मानधन वा भत्ता दिला जात नाही, अशा  सेविकांना महापालिकेकडून प्रोत्साहनपर भत्ते, वेतन तसेच विम्याचे संरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.मानधन मिळेना वेळेवरआरोग्य अभियानांतर्गत आशा सेविका या शहरातील बालमृत्यू रोखणे, गर्भवती मातांचा मृत्युदर कमी करणे, विविध आजारांचे रुग्ण शोधणे व त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करत होत्या. मात्र, कोरोनाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी आशा सेविकांवर सोपविली आहे. या सेविकांना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. या सेविकांना सध्या वेतन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. सध्या या सेविका आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. यांच्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. यात अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी वर्ग, मनपाचे सर्वेक्षणातील कर्मचाऱ्यांचा तसेच पोलीस या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देणाऱ्या व शहरातील नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण तसेच पगार, मानधन इत्यादी देण्यात आलेले आहे. - नाना काटे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल