शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी वायसीएममधील भोंगळ कारभार : डॉक्टरांच्या बेफिकीरीने त्याने गमावली पायाची बोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:44 IST

किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता...

ठळक मुद्देतक्रारीनंतर होणार चौकशी 

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचा भोंगळ कारभार अवघ्या दोन आठवड्यांत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता. त्यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. आता पुन्हा एकदा पायाच्या बोटांना गंभीर दुखापत असूनही जखमेवर केवळ मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यांच्या बेपर्वाईमुळे रुग्णाला पायाची दोन बोटे गमावण्याची वेळ आली. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. अजंठानगर येथील रहिवासी अशोक रामभाऊ धेंडे (वय ५५) यांच्या डाव्या पायाच्या दोन बोटांना शनिवारी (दि.२०) रोजी अपघात झाल्याने गंभीर जखम झाली होती. त्यांच्या पायाची दोन बोटे अर्धी तुटली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी तत्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. उपचार करतेवेळी अर्ध्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया अथवा अन्य तातडीक उपचार होणे अपेक्षित होते. मात्र गांभीयार्ने दखल न घेता, डॉक्टरांनी जखमेवर केवळ तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडले. गंभीर स्वरूपाची दुखापत असूनही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. गंभीर जखम असताना केवळ मलमपट्टी करून घरी गेलेल्या रुग्णाच्या बोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दुसºया दिवशीही रुग्णाच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर खासगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, वेळीच उपचार न केल्यामुळे पायाची दोनही बोटे निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तातडीने उपचार केले असते तर रुग्णाच्या पायाची बोटे गमवावी लागली नसती. यामध्ये वायसीएमच्या डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. --------------वायसीएम रुग्णालय हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. मात्र येथे गरीब रुग्णांना काहीच फायदा होत नाही. या रुग्णाला वायसीएमच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे दोन बोटे गमवावी लागली आहेत. रुग्णाचे नुकसान झाले, त्यामुळे वायसीएम प्रशासनाने त्यास भरपाई द्यावी. - राहुल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते. ------------रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखी स्वरुपामध्ये तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय. ---------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल