शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीत १० अनधिकृ त बांधकामांवर हातोडा, महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:10 IST

महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्र.२७ परिसरातील १० वाढीव व नव्याने बांधलेली आरसीसी, वीटबांधकाम इ. अनधिकृत अंदाजे ५२००.०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.

रहाटणी : महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्र.२७ परिसरातील १० वाढीव व नव्याने बांधलेली आरसीसी, वीटबांधकाम इ. अनधिकृत अंदाजे ५२००.०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.गेल्याकाही दिवसांपासून महापालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक गुंठा अर्धा गुंठ्यात ज्या नागरिकांचे बांधकाम आहे. त्यांनाही महापालिका प्रशासनाने नोटीस दिली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. कारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.प्रभाग क्रमांक २७ राहटणी -श्रीनगर परिसरातील तापकीर मळा चौकाजवळ यासह डी-मार्ट मॉल समोरील आरसीसी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.या संबंधित मिळकतधारकांना धोकादायक बांधकाम काढून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कारवाई काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर अग्निशमन दल व रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पोलिसांसह वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.आवाहन : परवानगी घेऊनच बांधकाम करावेअनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी परवाना घेऊनच बांधकामे करावित. अन्यथा कारवाई करण्यात येईल. गुंतागुंत कमी करून बांधकाम परवाना सहज मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी महापालिका करीत होते.१ जेसीबी, १ डम्पर, १० मजूर, २ ब्रेकर आणि मनपाचे १० पोलीस कर्मचारी अधिकारी, वाकड पोलीस स्टेशन १५ पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने कारवाई झाली. ‘ग’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली व १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता यांच्यासह ७ क्षेत्र अधिकारी, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड